सेहवाग गंभीरला स्थान, पण सचिन -धोनीला नाही, या दिग्गज खेळाडूची IPL टीम पाहिलीत का?

दिनेश कार्तिक आयपीएलच्या बऱ्याच आयपीएल टीममधून खेळला आहे. त्याने असे क्रिकेटर आपल्या आयपीएल प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट केले आहेत ज्या खेळाडूंबरोबर तो खेळला आहे. Dinesh Karthik IPL Playing XI

सेहवाग गंभीरला स्थान, पण सचिन -धोनीला नाही, या दिग्गज खेळाडूची IPL टीम पाहिलीत का?
MS Dhoni
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 7:52 AM

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2021) जवळपास सगळ्या देशांचे खेळाडू सहभागी होतात. अनेक युवा खेळाडूंना आयपीएलच्या माध्यमातून आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते. आयपीएलने भारतीय क्रिकेटला अनेक युवा खेळाडू दिले ज्यांनी पुढे जाऊन भारतीय संघासाठी चांगला खेळ केला. आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या अगोदर भारताचा विकेट कीपर फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) काही अटींवर तुझ्या आयपीएल टीममध्ये कोण प्लेअर असतील?, असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने एम.एस. धोनी (MS Dhoni) आणि सचिन तेंडुलकर (Sachin tendulkar) यांना स्थान दिलं नाही. त्याचवेळी त्याने गंभीर (Gautam Gambhir) आणि सेहवागला (Virendra Sehwag) ओपनर खेळाडू तर विराट (Virat kohli), रोहित (Rohit Sharma) आणि स्वत:ला अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा फलंदाज सांगितलं. (Dinesh Karthik IPL Playing XI Virat Rohit No MS Dhoni Sachin tendulkar)

दिनेश कार्तिक आयपीएलच्या बऱ्याच आयपीएल टीममधून खेळला आहे. त्याने असे क्रिकेटर आपल्या आयपीएल प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट केले आहेत ज्या खेळाडूंबरोबर तो खेळला आहे. पाठीमागच्या 13 वर्षांपासून तो आयपीएलच्या विविध हंगामात विविध संघाबरोबर खेळला आहे.

कार्तिकच्या टीममध्ये दिग्गज खेळाडू

कार्तिकला आपल्या टीममध्ये असेच खेळाडू घ्यायला सांगितले होते की ज्या खेळाडूंबरोबर तो आयपीएलमध्ये स्वत: खेळला आहे. क्रिकबजसोबत हा राऊंड पार पडला. ज्यात कार्तिकने आपल्या आयपीएल संघात सचिन आणि धोनीला स्थान दिलं नाही. कारण कार्तिक आयपीएलध्ये सचिन आणि धोनीसोबत खेळला नाही.

कार्तिकच्या संघात त्या 7 खेळाडूंना जागा मिळाली आहे की ज्या 7 खेळाडूंबरोबर कार्तिक कधी ना कधी खेळला आहे. कार्तिकने वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरला ओपनर सांगितलं. तर विराट आणि रोहितला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमाकांचा फलंदाज सांगितलं. पाचव्या क्रमांकावर स्वत:, तर सहाव्या क्रमाकांवर आंद्रे रसेलला त्याने स्थान दिलं.

कार्तिकच्या बोलिंग युनिटमध्ये कोण कोण?

तर बोलिंगमध्ये सुनील नरेन, ग्लेन मॅकग्रा, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि मिशेल स्टार्क यांना कार्तिकने संधी दिली. कार्तिकला धोनी आणि सचिनचा आपल्या आयपीएल संघात समावेश करायचा होता पण तो ज्या खेळाडूंबरोबर आयपीएल खेळलाय, अशात खेळाडूंचा समावेश करण्यात यावा, अशी अट असल्याने त्याला धोनी-सचिनचा समावेश करणं शक्य झालं नाही.

(Dinesh Karthik IPL Playing XI Virat Rohit No MS Dhoni Sachin tendulkar)

हे ही वाचा :

युवा खेळाडू तयार, सिनियरच्या निवृत्तीचा काहीही फरक पडणार नाही; मोहम्मद शमीचं रोखठोक मत

केवळ दिल्लीचं नाही तर येणाऱ्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेन; या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी

एकदिवसीय मालिकांचा हुकमी एक्का ! विराट कोहली ICC ODI रँकिंगमध्ये पहिला

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.