दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळणार संधी? गावस्करांची भविष्यवाणी

टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ घोषित करण्यात आला आहे. यावर गावस्कर यांनी भविष्यवाणी केली आहे. ते काय म्हणालेत जाणून घ्या....

दिनेश कार्तिक की ऋषभ पंत, प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला मिळणार संधी? गावस्करांची भविष्यवाणी
गावस्करांची भविष्यवाणीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 9:02 PM

मुंबई : नुकतीच टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यात काही खेळाडूंना गळण्यात आलंय. तर ज्या खेळाडूंची कधीही चर्चाही नव्हती. त्यांना संधी मिळाली आहे. यात अशी चार नावं देखील आहेत. तर काही खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलंय. दरम्यान, ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) संदर्भात दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) मोठी भविष्यवाणी केली आहे. ते नेमके काय म्हणालेत ते जाणून घ्या…

सुनील गावस्कर काय म्हणालेत?

माजी दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाबाबत आपलं मत मांडलंय. कार्तिक आणि पंत या दोघांना विश्वचषकातील प्लेईंग-11 मध्ये बघायला आवडेल, असं त्यांनी म्हटलंय. यामागचं कारण सांगताना गावसकर म्हणालेत की, टीम इंडियाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर धोका पत्करावा लागेल. विश्वचषक स्पर्धेत भारताच्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. त्याचबरोबर केएल राहुल उपकर्णधार असेल.

आशा वाढल्या…

आगामी T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. यात दोन यष्टिरक्षक फलंदाजांचा समावेश करण्यात आलाय. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांचाही 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आलाय. संघाच्या घोषणेनंतर कार्तिकनं सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आणि ‘स्वप्न खरोखरच पूर्ण होतात’ असं त्यानं म्हटलंय. कार्तिक 2010 नंतर प्रथमच टी-20 विश्वचषक खेळणार आहे.

भारत विश्वचषक जिंकू शकतो…

गावस्कर पुढे म्हणाले की, मला वाटते की संघातील संतुलनामुळे भारत विश्वचषक जिंकू शकतो. आशिया चषक स्पर्धेत जे घडले ते वेक अप कॉल होते. मला आशा आहे की हा संघ विश्वचषकासह पुनरागमन करेल. निवड झालेल्या संघाला आपण पाठिंबा दिला पाहिजे. आपण संघाला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे,’ असंही गावस्कर म्हणालेत.

आशिया चषकावरही भाष्य

यावेळी गावस्कर यांनी आशिया चषकावरही भाष्य केलंय, ‘आशिया चषकात समस्या ही होती की आमच्याकडे एकूण बचाव करू शकणारे गोलंदाज नव्हते. आता जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल परतले आहेत, ते दोघेही असे गोलंदाज आहेत जे लक्ष्याचा बचाव करू शकतात आणि डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखू शकतात. जर तुम्ही प्रथम गोलंदाजी करत असाल तर सुरुवातीच्या षटकांमध्ये ते घातक ठरू शकतात. या दोघांच्या एकत्र येण्याने संघ अधिक मजबूत झाला.’ गावस्कर यांनी दाखवलेला विश्वास टीम इंडियाला आता सार्थ करावा लागणार आहे.

संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.