“माझ्या बाबांनी जे काही सांगितलं ते…”, वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर आर अश्विनला खरं सांगावं लागलं
आर अश्विनच्या निवृत्तीनंतर बऱ्याच चर्चा होत आहे. नेमकं काय झालं इथपासून अपमान वगैरे वगैरे. त्यात अश्विनच्या वडिलांनी आरोप केल्याने त्याला आणखी धार मिळाली. माझा मुलाचा पदोपदी अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता यावर खुद्द आर अश्विनने खुलासा केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान आर अश्विनच्या निवृत्तीचा मुद्दा गाजत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आर अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर क्रीडाप्रेमींना नेमकं काय झालं ते कळेना. आर अश्विन तात्काळ ड्रेसिंग रुममधून बाहेर पडला आणि भारतातही आला. जणू काय सर्व तयार होतं अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. असं असताना आर अश्विनच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी मुलाचा अपमान झाला आणि त्यामुळेच त्यांनी निवृत्ती घेतली असा घणाघाती आरोप केला. खुद्द वडिलांनी असा आरोप केल्याने त्यात काहीतरी तथ्य असेल असंच प्रत्येक जण म्हणत होता. पण या चर्चा रंगत असताना आता खुद्द आर अश्विनने सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलं आहे. आर अश्विनला टॅग करत एक ट्वीट केलं होतं. त्याला रिप्लाय देताना त्याने याबाबत खरं काय ते सांगितलं आहे. एका युजर्सने विचारलं की, तुझे बाबा म्हणतात की अपमान झाला आणि किती दिवस सहन करायची अपेक्षा ठेवू शकता. तसेच त्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यावर अश्विनने रिप्लाय दिला आहे.
“माझे बाबा मीडिया प्रशिक्षित नाहीत, dey father enna da ithelaam . मला कधीच वाटले नव्हते की तुम्ही “बाबांच्या विधानांची” ही समृद्ध परंपरा पाळाल. तुम्हा सर्वांना विनंती आहे की त्यांना क्षमा करा आणि त्याला एकटे सोडा.”, असं ट्वीट करत आर अश्विनने नमस्कारचा इमोजी टाकला आहे. इतकंच काय तर पोस्टमध्ये हसरे इमोजी टाकून तसं काहीच झालं नसल्याचं पुरावा दिला आहे.
My dad isn’t media trained, dey father enna da ithelaam 😂😂.
I never thought you would follow this rich tradition of “dad statements” .🤣
Request you all to forgive him and leave him alone 🙏 https://t.co/Y1GFEwJsVc
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) December 19, 2024
आर अश्विनने घरी परतल्यानंतर मीडियाशी चर्चा केली होती. पण त्यावेळी वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर काहीच बोलला नव्हता. तसेच आयपीएल 2025 साठी तयारी करत असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. भारतासाठी खेळणार नसलो तरी आयपीएलमध्ये खेळेन असं स्पष्ट केलं होतं. त्याचबरोबर बरीच वर्षे क्रिकेट खेळण्याचा मानसही बोलून दाखवला होता. आता आर अश्विनच्या चाहत्यांना आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहता येणार आहे.