Duleep Trophy Final 2023 | दुलीप ट्रॉफी फायनलसाठी दोन्ही संघ निश्चित, आता 12 जुलैला महामुकाबला
Duleep Trophy 2023 Final | देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या समजल्यान जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील महाअंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत.
बंगळुरु | भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. पहिला सेमी फायनल सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली.मात्र दुसऱ्या सेमी फायनल मॅचचा निर्णय लागला. हा सामना फार रंगतदार झाला. पहिल्या सेमी फायनल सामन्यात वेस्ट झोन विरुद्ध सेंट्रल झोन आमनेसामने होते. हा सामना अनिर्णित राहिला. मात्र विजेता संघ ठरवणं महत्वाचं होतं. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर वेस्ट झोन टीमने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय केलं. वेस्ट झोनकडे पहिल्या डावात 92 धावांची निर्णायक आघाडी होती. या आघाडीमुळे वेस्ट झोनने क्वालिफाय केलं.
तर दुसऱ्या सेमी फायनल सामना साऊथ झोन विरुद्ध नॉर्थ झोन यांच्यात पार पडला. या सामन्यान नॉर्थ झोनवर 2 विकेट्सने विजय मिळवत साऊथ झोनने फायनलमध्ये धडक दिली. अशा प्रकारे दुलीप ट्रॉफीसाठी दोन्ही संघ ठरले.
पहिल्या सेमी फायनलबाबत थोडक्यात
पहिल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट झोनने सेंट्रल झोनला विजयासाठी 390 धावांचं आव्हान दिलं. सेंट्रल झोनने 4 विकेट्स गमावून 128 धावा केल्या. त्यानंतर पाऊस आला. त्यामुळे टी ब्रेकनंतरही खेळाला सुरुवात झाली नाही. वेस्ट झोनला जिंकण्याची संधी होती. मात्र पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावाातील आघाडीच्या निकषावर वेस्ट झोनने बाजी मारली आणि अंतिम सामन्यात पोहचणारी पहिली टीम ठरली.
दुसऱ्या सेमी फायनलचा धावता आढावा
साऊथ विरुद्ध नॉर्थ झोन यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्याील पहिल्या डावात नॉर्थ झोनने 198 धावा केल्या. त्या प्रत्युतरात साऊथ झोनला 195 धावा करता आल्या. नॉर्थ झोनने त्यानंतर दुसऱ्या डावात 211 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे साऊथ झोनला विजयाासाठी 215 धावांचं आव्हान मिळालं. साऊथ झोनने हे विजयी आव्हान 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
दुलीप ट्रॉफी फायनल 2023 बाबत
⚔️ ? ????? ??????! Who will lift the Duleep Trophy 2023?
? Mayank Agarwal's resilience in both the innings, with Kaverappa and Vyshak taking five-wicket hauls each, propelled South Zone into the final.
? Pujara's gritty ton combined with Nagwaswalla's five-wicket… pic.twitter.com/1w5KZZ2ymA
— The Bharat Army (@thebharatarmy) July 8, 2023
आता बुधवार 12 ते रविवार 16 जुलै दरम्यान वेस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन यांच्यात ट्रॉफीसाठी महाअंतिम सामना होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. वेस्ट झोन टीमचं नेतृत्व प्रियांक पांचाळ करणार आहे. तर साऊथ झोनची कॅप्टनसी हनुमा विहारी करणार आहे. त्यामुळे आता ही ट्रॉफी कोण उचलणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.