Duleep Trophy 2024 स्पर्धेला कधीपासून सुरुवात? विराट-रोहितही खेळणार! पाहा वेळापत्रक

Duleep Trophy 2024 Schedule And Venue: दुलीप ट्रॉफीने देशांतर्गत क्रिकेट 2024-2025 स्पर्धेच्या मोहिमेचा श्रीगणेशा होणार आहे. या स्पर्धेत विराट-रोहित खेळणार असल्याची चर्चा असल्याने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

Duleep Trophy 2024 स्पर्धेला कधीपासून सुरुवात? विराट-रोहितही खेळणार! पाहा वेळापत्रक
virat and rohit
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 8:19 PM

टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे.टीम इंडियाचा श्रीलंका दौरा आटोपला आहे. बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. बांगलादेश टीम इंडिया विरुद्ध या दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने होणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दरम्यानच्या काळात टीम इंडियातील खेळाडू हे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहेत. बीसीसीआयच्या 2024-2025 देशांतर्गत स्पर्धेचा श्रीगणेशा दुलीप ट्रॉफीने होणार आहे. आपण या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.

दुलीप ट्रॉफी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा आधी झोनल फॉर्मेटनुसार खेळवण्यात यायची. अध्यक्ष अजित आगरकर आणि निवड समितीने ही स्पर्धा झोनल ऐवजी टीम फॉर्मेटनुसार खेळवण्याचा निर्णय केला. त्यानुसार आता या स्पर्धेत एकूण 4 संघ असणार आहेत. या संघांची नावं ही अनुक्रमे टीम ए, टीम बी, टीम सी आणि टीम डी अशी आहेत. या चारही संघात यंदा टीम इंडियाचे अनुभवी खेळाडूही असणार आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळण्याची संधी फार कमी आहे.

देशांतर्गत स्पर्धा 2024-2025 चं वेळापत्रक

दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 सप्टेंबरला स्पर्धेची सांगता होणार आहे. प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. प्रत्येक सामना हा 4 दिवसांचा असणार आहे. सलामीचा सामना हा 5 सप्टेंबरला इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना हा इंडिया सी विरुद्ध इंडिया डी यांच्यात होणार आहे. स्पर्धेतील सारे सामने अनंतपूर येथे होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दुलीप ट्रॉफी 2024-25 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

अनुक्रमांक तारीख सामना वेळ
1 5 सप्टेंबर टीम ए विरुद्ध टीम बी सकाळी 9 वाजता
2 5 सप्टेंबर टीम सी विरुद्ध टीम डी सकाळी 9 वाजता
3 12 सप्टेंबर टीम ए विरुद्ध टीम डी सकाळी 9 वाजता
4 12 सप्टेंबर टीम बी विरुद्ध टीम सी सकाळी 9 वाजता
5 19 सप्टेंबर टीम बी विरुद्ध टीम डी सकाळी 9 वाजता
6 19 सप्टेंबर टीम ए विरुद्ध टीम सी सकाळी 9 वाजता
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.