Video : हर्षित राणावर पुन्हा एका सामन्याची बंदी? दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत नको ते केलं

दुलीप ट्रॉफी स्पर्देत इंडिया सी आणि इंडिया डी हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यातील पहिल्या डावात इंडियाने सर्वबाद 164 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंडिया सी संघाच्या 4 विकेट गेल्या आहेत. तसेच बरोबरी साधण्यासाठी 73 धावांची गरज आहे. असं असताना हर्षित राणाचं सेलिब्रेशन चर्चेत आलं आहे.

Video : हर्षित राणावर पुन्हा एका सामन्याची बंदी? दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत नको ते केलं
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 9:46 PM

देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत चार संघ असून दिग्गज खेळाडू खेळत आहे. इंडिया सी आणि इंडिया डी संघात सामना होत आहे. हा सामना अनंतपूर येथील ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियमवर होत आहे. इंडिया सी संघाने म्हणजे ऋतुराज गायकवाडच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर श्रेयस अय्यरच्या संघाला फलंदाजीचं आव्हान दिलं. पण इंडिया डी संघ सर्वबाद 164 धावा करू शकला. अक्षर पटेल वगळचा संपूर्ण संघच अपयशी ठरला आहे. इंडिया डी संघाने दिलेल्या 164 धावांचा पाठलाग करण्यासाठी इंडिया सी संघ मैदानात उतरला. यावेळी आघाडीचे चार फलंदाज झटपट बाद झाले. ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, आर्यन जुयल आणि रजत पाटिदार हे खेळाडू झटपट बाद झाले. यात हर्षित राणाने 2 आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन गडी बाद केले. यावेळी हर्षित राणाने केलेलं सेलिब्रेशन चर्चेत आलं आहे. हर्षित राणाने इंडिया सी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट घेतली आणि अनोखं सेलिब्रेशन केलं.

पाचव्या षटकात हर्षित राणाने साई सुदर्शनची विकेट काढली. त्यानंतर संघाचं सातवं षटक टाकण्यासाठी श्रेयस अय्यरने पुन्हा हर्षित राणाला बोलवलं. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला. 19 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 5 धावा केल्या. हर्षितच्या गोलंदाजीवर श्रीकर भारतने त्याचा झेल पकडला. विकेट घेताच हर्षित राणाने मैदानात फ्लाइंग किस देत विकेट साजरी केली. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत हर्षित राणाने हैदराबादचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर असंच सेलिब्रेशन केलं होतं. तेव्हा मयंक अग्रवालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता आणि फ्लाइंग किस घेऊन सेलिब्रेशन केलं होतं. या सेलिब्रेशनसाठी मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. अशीच सेलिब्रेशनची पुनरावृत्ती दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात केली होती. तेव्हा सामना फीच्या 100 टक्के दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. आता राणाने पुन्हा तशीच चूक केली आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.

MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.