Duleep Trophy 2024 : पहिल्याच दिवशी तिन्ही कर्णधार अपयशी, ऋतुराज-श्रेयस फ्लॉप
Duleep Trophy 2024: दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या दिवशी 4 पैकी 3 संघांचे कर्णधार हे अपयशी ठरले आहेत. श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या सामन्यात इंडिया सी विरुद्ध इंडिया डी आमनेसामने आहेत. इंडिया ए विरुद्ध इंडिया बी यांच्यातील सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. तर इंडिया सी विरुद्ध इंडिया डी यांच्यातील सामन्याचं आयोजन हे अनंतपूर येथे करण्यात आलं आहे. इंडिया बी ने इंडिया ए विरुद्ध पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 79 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. तर इंडिया सी 73 धावांनी पिछाडीवर आहे. मात्र पहिल्या दिवशी कर्णधारांनी निराशाजनक कामगिरी केली. एकूण 4 पैकी 3 कर्णधार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. तर एका कर्णधाराच्या संघाची अजून बॅटिंगची वेळ आली नाही.
कर्णधारांची निराशाजनक कामगिरी
शुबमन गिल आणि अभिमन्यू इश्वरन हे दोघे अनुक्रमे इंडिया ए आणि इंडिया बी चे कर्णधार आहेत. पुणेकर ऋतुराज गायकवाड इंडिया सी संघाचा कॅप्टन आहे. तर मुंबईकर श्रेयस अय्यर याच्याकडे इंडिया डी ची धुरा आहे. शुबमन गिल याची बॅटिंगची वेळ आली नाही. मात्र ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अभिमन्यू इश्वरन हे तिघेही अपयशी ठरले. अभिमन्यू इश्वरन याने 42 बॉलमध्ये 1 फोरसह 13 रन्स केल्या. श्रेयस अय्यरला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. श्रेयस 16 बॉलमध्ये 9 रन्स करुन आऊट झाला. तर ऋतुराज गायकवाडने 19 चेंडूत 5 धावा केल्या.
पहिल्या दिवसाचा धावता आढावा
इंडिया बी ने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 79 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. इंडिया बीकडून मुशीर खान याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मुशीरने 227 चेंडूत 105 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मुशीरकडून इंडिया बी संघाला द्विशतकाची अपेक्षा असणार आहे. तर इंडिया सीने इंडिया डीच्या 164 धावांच्या प्रत्युत्तरात 33 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 91 पर्यंत मजल मारली आहे.
इंडिया सी प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीथ, आर्यन जुयाल, हृतिक शोकीन, विजयकुमार वैशाख, मानव सुथार, अंशुल कंबोज आणि हिमांशू चौहान.
इंडिया डी प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, यश दुबे, रिकी भुई, श्रीकर भरत, अथर्व तायडे (विकेटकीपर), अक्षर पटेल, सरांश जैन, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि आदित्य ठाकरे.
इंडिया बी प्लेइंग ईलेव्हन: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि यश दयाल.
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान आणि खलील अहमद.