दुलीप ट्रॉफीमध्ये टीम इंडियाकडून एकच कसोटी खेळलेल्या या खेळाडूचा कहर, पठ्याने घेतल्या नऊ विकेट पाहा कोण?
Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीमध्ये युवा बॉलरने कहर केला असून पहिल्याच सामन्यामध्ये त्याने नऊ विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाकडून या खेळाडूने एक कसोटी सामनाही खेळला आहे. पाहा कोण आहे तो खेळाडूु?

टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये येत्या 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झालेली नाही. लवकरच बीसीसीआय दोन कसोटींसाठी टीमची घोषणा करणार आहे. या मालिकेमध्ये निवड होण्यासाठी दुलीप ट्रॉफीमधील खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये असा खेळाडू ज्याने टीम इंडियाकडून एक कसोटी खेळली आहे. मात्र दुलीप ट्रॉफीत त्याने राडा केला आहे. भारत अ संघाकडून खेळताना त्याने एकाच सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
2024 मध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेमधील रांची येथे झालेल्या कसोटी सामन्यात या खेळाडूला संधी मिळाली होती. या कसोटी सामन्यामध्ये त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याला काही प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. मात्र या गोलंदाजाने भारत अ संघाकडून खेळताना दमदार प्रदर्शन करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोण आहे तो खेळाडू?
हा स्टार बॉलर दुसरा तिसरा कोणी आकाश दीप आहे. आकाश दीप याने पहिल्या डावात चार विकेट तर दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या. शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या आकाश दीप याने एकूण नऊ विकेट घेतल्या खऱ्या पण टीमचा पराभव झाला. भारत ब टीमने भारत अ टीमचा 76 धावांनी पराभव केला. आकाश दीप याने या सामन्यामध्ये आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 2024 च्या सुरुवातीला पाच सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेमध्ये आकाश दीप याला एका कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने विकेट घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर करण्यात आलं आणि टीममधूनही तो बाहेर झाला होता. परंतु हार न मानत आपली मेहनत सुरू ठेवली आणि परत एकदा आपल्या कामगिरीच्या जोरावर निवडकर्तांना आपली निवड करण्यासाठी भाग पाडलं.
Fantastic 🖐️
Akash Deep has bowled brilliantly and picked up 9 wickets in the match 🙌
Re-live his five-wicket haul in the 2nd innings 📽️🔽 #DuleepTrophy | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/eQyu38Erb1 pic.twitter.com/Cc95TyaqdU
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 8, 2024
आकाश दीप हा बिहारचा आहे. तरी त्याने 2019 मध्ये बंगालकडून डेब्यू केला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 31 सामने खेळताना त्याने 23.70 च्या सरासरीने एकूण 107 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने चार वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.तर सात वेळा एका डावात 5 विकेट घेण्यासोबतच त्याने एका सामन्यात 10 विकेट्सही घेतल्या आहेत.
भारत ब (प्लेइंग इलेव्हन): अभिमन्यू ईश्वरन (C), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (Wk), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल.
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (C), मयंक अग्रवाल, केएल राहुल, रियान पराग, ध्रुव जुरेल (WK), शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, आवेश खान, खलील अहमद