मयंक अग्रवालकडे मोठी जबाबदारी! रियान पराग, शिवम दुबे आणि आवेश खानला ऐकावं लागणार

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चारही संघ सज्ज आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघाची निवड झाल्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मोठी उलथापालथ झाली आहे. संघाच्या कर्णधारापासून नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. अशीच ए संघाची जबाबदारी शुबमन गिलनंतर बदलली आहे.

मयंक अग्रवालकडे मोठी जबाबदारी! रियान पराग, शिवम दुबे आणि आवेश खानला ऐकावं लागणार
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 4:16 PM

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामना 12 सप्टेंबरला होणार आहेत. या सामन्यांसाठी संघांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. कारण दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या काही खेळाडूंची वर्णी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी लागली आहे. त्यामुळे इंडिया ए, इंडिया बी आणि इंडिया सी संघ उलथापालथ झाली आहे. त्यामुळे या संघात अपेक्षित बदल करण्यात आले आहेत. शुबमन गिल याची वर्णी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात लागली आहे. त्यामुळे इंडिया ए संघाची धुरा मयंक अग्रवालच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मयंक अग्रवालच्या नेतृत्वात दिग्गज खेळाडूंना खेळावं लागणार आहे.  अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वातील इंडिया बी संघाने शुबमन गिलच्या नेतृत्वातील इंडिया ए संघाला पराभवाचं पाणी पाजलं होतं. स्पर्धेतील दुसरा सामना इंडिया ए आणि इंडिया डी या संघात होणार आहे. या दोन्ही संघानी स्पर्धेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी धडपड करताना दिसतील. हा सामना अनंतपूर येथे होणार आहे. यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सामना 19 सप्टेंबरला होणार आहे.

इंडिया ए संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्र, शास्वत रावत, प्रथम सिंह, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलानी, आकिब खान.

मयंक अग्रवाल दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण या संघातून शुबमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरैल, कुलदीप यादव आणि आकाश दीप हे खेळाडू भारतीय संघात खेळणार आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 पाच खेळाडूंचा फटका बसणार आहे. प्लेइंग 11 मध्ये रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान असतील यात शंका नाही. तर पहिल्या सामन्यातील तनुष कोटियन आणि खलील अहमद यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इंडिया बी संघात यशस्वी जयस्वालच्या जागी रिंकु सिंहला संधी मिळाली आहे. ऋषभ पंतच्या जागी सुयश प्रभुदेसाई याला स्थान मिळालं आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.