Video : शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने केली भरपाई, तसं नाही तर असं मिळवणार टीम इंडियात स्थान!

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया डी संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात इंडिया ए संघाचं पारडं जड आहे. श्रेयस अय्यर या सामन्यातही फलंदाजीत फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. पण दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या चेंडूवर कमाल केली.

Video : शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने केली भरपाई, तसं नाही तर असं मिळवणार टीम इंडियात स्थान!
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 8:14 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत दुसरा सामना इंडिया ए आणि इंडिया डी संघात रंगला आहे. इंडिया डी संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पण या सामन्याच्या पहिल्या डावात फेल गेला. एकीकडे टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. दुसरीकडे, फॉर्म कायम ठेवणं कठीण झालं आहे. दुसऱ्या डावात संघाला गरज असताना अवघ्या 7 चेंडूचा सामना केला आणि विकेट देऊन गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. पण फलंदाजीत फेल ठरला असला तरी गोलंदाजी त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. आता त्याच्या या विकेटची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. इंडिया ए संघाची दिवसअखेर 115 वर 0 अशी स्थिती होती. मग काय कर्णधार श्रेयस अय्यरने चेंडू हातात घेतला. समोर मयंक अग्रवाल होता. श्रेयसच्या फिरकीची जादू मयंकला कळलीच नाही आणि त्याच्याच हातात झेल देऊन बाद झाला. यावेळी श्रेयस अय्यरचा आनंद काही वेगळाच सांगत होता. मयंक अग्रवाल 87 चेंडूत 56 धावा करून बाद झाला.

श्रेयस अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तशी जास्त गोलंदाजी केलेली नाही. पण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने पाच गडी बाद केले आहेत. आता श्रेयस अय्यर बॅट आणि बॉल या दोन्ही पातळीवर योग्य ठरला तर त्याच्यासाठी संघात जागा बनू शकते. पण त्याला फलंदाजीत कमाल करणं तितकंच गरजेचं आहे. आता दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरच्या वाटेला फलंदाजी आली तर किती धावा करतो याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात इंडिया ए संघाचं पारडं जड आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकून कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सर्वकाही ठीक चाललं होतं. आघाडीचे फलंदाजही झटपट बाद झाले होते. पण शम्स मुलानीने एक बाजू धरून ठेवली आणि संघाला 290 धावांपर्यंत पोहोचवलं. दुसरीकडे, या धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरचा संघ ढासळला आणि 183 धावांवर तंबूत परतला. इंडिया ए संघाकडे 107 धावांची आघाडी असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यात 115 धावांची भर पडली आहे. संघाची धावसंख्या 222 इतकी झाली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.