4,4,4,4,4..! भावाची विकेट घेणाऱ्या गोलंदाजावर सरफराज खान तुटून पडला, पाहा व्हिडीओ काय केलं ते

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघाचा सामना चौथ्या दिवसापर्यंत गेला आहे. दुसऱ्या डावात इंडिया ए संघाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. 150 धावांवर 6 गडी तंबूत पाठवले. पण पहिल्या डावात 181 धावा करणारा मुशीर खान दुसऱ्या डावात फेल ठरला. याच सामन्यात सरफराजने जबरदस्त खेळी केली.

4,4,4,4,4..! भावाची विकेट घेणाऱ्या गोलंदाजावर सरफराज खान तुटून पडला, पाहा व्हिडीओ काय केलं ते
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 7:49 PM

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील इंडिया ए आणि इंडिया बी संघाचा सामना बंगळुरुत सुरु आहे. या सामन्याचा तीन दिवसांचा खेळ संपला असून इंडिया बी संघाकडे 240 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात इंडिया बी संघाकडे 90 धावांची आघाडी होत त्यात दुसऱ्या डावात 150 धावा केल्या. पण दुसऱ्या डावात बी संघाचे 6 गडी बाद झाले आहेत. पहिल्या डावात बी संघासाठी हिरो ठरलेला मुशीर खान दुसऱ्या डावात फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. पण ही कसर सरफराज खानने भरून काढली. पहिल्या डावात सरफराज खानला काही खास करता आलं नव्हतं. पण दुसऱ्या डावात 36 चेंडूत 46 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारले. यातील पाच चौकार तर त्याने एकाच षटकात मारले. याच गोलंदाजाने मुशीर खानला शून्यावर तंबूत पाठवलं होतं आकाश दीपने त्याचा ध्रुव जुरेलच्या हाती झेल देत खेळ संपवला. मुशीर खान बाद झाल्यानंतर सरफराज खान मैदानात उतरला.

सरफराज खान पहिल्या डावात 9 धावा करून बाद झाला होता. त्याचं एकेरी धावांवर बाद होणं संघासाठी धक्कादायक होतं. कारण गेल्या दोन तीन वर्षात सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याने पहिल्या डावातील राग दुसऱ्या डावात काढला असं म्हणायला हरकत नाही. कारण दुसऱ्या डावात त्याने आक्रमक फलंदाजी करत गोलंदाजांची धुलाई केली. आकाश दीपने 4 षटकात फक्त 6 धावा देत 2 गडी बाद केले होते. पण पाचव्या षटकात सर्व काही बदललं.

आकाश दीपचा पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर सरफराजने आकाश दीपचे पाचही चेंडूंवर चौकार मारले. इतकंच काय तर खलील अहमदला एक षटकार आणि चौकारही मारला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि एक षटकार मारला आणि 36 चेंडूत 46 धावा केल्या. पण आवेश खानने त्याची विकेट घेतली. त्याने 127.78 च्या स्ट्राईक रेटने 46 धावा केल्या. इंडिया ए आणि इंडिया बी संघासाठी चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे. कोण बाजी मारतं? याकडे लक्ष लागून आहे. पहिल्या सत्रात झटपट चार गडी बाद करण्यात यश मिळालं तर शुबमनचा संघ विजयासाठी प्रयत्न करेल. अन्यथा हा सामना इंडिया बीच्या पारड्यात पडेल.

'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.