दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एन्ट्री मिळताच इशान किशनची जादू चालली, ठोकलं दमदार शतक

| Updated on: Sep 12, 2024 | 3:41 PM

दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील इंडिया सी संघात इशान किशनची अचानक एन्ट्री झाली. तसेच त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे. असं असताना पहिल्याच सामन्यात इशान किशनने आपल्या खेळीने छाप सोडली.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एन्ट्री मिळताच इशान किशनची जादू चालली, ठोकलं दमदार शतक
Follow us on

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात इंडिया सी आणि इंडिया बी या संघात सामना सुरु आहे. इंडिया बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याच निर्णय घेतला. पण जेव्हा संघ जाहीर झाला तेव्हा या संघात इशान किशनचं नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण दुसऱ्या टप्प्यातील सामन्यापूर्वी इशान किशनचं नाव कुठेही नव्हतं. त्यामुळे त्याची अचानक झालेली एन्ट्री आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. इशान किशन कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात मैदानात उतरला आहे. संघाची धावसंख्या 96 असताना रजत पाटीदार 40 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर इशान किशन मैदानात उतरला आणि त्याने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. बुची बाबू स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीची चमक दिसली. 121 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 85.12 इतका होता. त्याच्या खेळीनंतर त्याने टीम इंडियाचं दार पुन्हा एकदा ठोठावलं आहे.

दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यात दुखापतीमुळे खेळला नव्हता. पण इंडिया सी संघात त्याची अचानक एन्ट्री झाली आणि पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली. 50 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यानंतर शतकाच्या दिशेने कूच केली. तसेच टी20 सारखी आक्रमक खेळी केली. इशान किशनने तिसऱ्या गड्यासाठी बाबा इंद्रजिथसोबत 150 धावांहून अधिक धावांची भागादारी केली. बाबा इंद्रजितन 93 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी केली. इशान किशनच्या आक्रमक खेळीमुळे पहिल्याच दिवशी ऋतुराजच्या संघाला 250 पार धावसंख्या करण्यास मदत झाली.  ऋतुराजच्या संघाने बी संघाला पराभूत केलं तर गुणतालिकेत अव्वल स्थानी राहील.

इंडिया सी (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), इशान किशन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, बाबा इंद्रजित, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मानव सुथार, अंशुल कंबोज, मयंक मार्कंडे, विजयकुमार विशाक, संदीप वॉरियर