रिंकु सिंहचं नशिब पालटलं, आधी डावललं आता मिळाली खेळण्याची संधी

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. या सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ निवडला आहे. यात दिग्गज खेळाडूंना स्थान मिळालं आहे. त्याचा फायदा थेट रिंकु सिंहला झाला आहे. एका अर्थाने त्याचं नशिब पालटलं असंच म्हणावं लागेल.

रिंकु सिंहचं नशिब पालटलं, आधी डावललं आता मिळाली खेळण्याची संधी
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 8:09 PM

देशांतर्गत दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचे सामने पार पडले आहेत. इंडिया ए विरुद्ध इंडिया बी आणि इंडिया सी विरुद्ध इंडिया डी यांच्यात सामना पार पडला. यात इंडिया बी आणि इंडिया सी यांनी विजय मिळवला आहे. असा सर्व स्पर्धेचा निकाल लागला असताना बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. पहिल्या सामन्यासाठी संघ जाहीर केला गेला आहे. त्यामुळे इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी संघात मोठा खड्डा पडला आहे. कारण निवड झालेले सर्वच खेळाडू 12 सप्टेंबरपासून चेपॉक मैदानावर सराव करणार आहे. त्यामुळे रिंकु सिंहचं नशिब पालटलं आहे. उर्वरित दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी इंडिया बी संघात त्याची निवड केली गेली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेत निवड झाल्याने त्याला आता यूपी टी20 लीग स्पर्धेत विराम घ्यावा लागेल. सध्या रिंकु सिंह मेरठ मॅवेरिक्स संघातून यूपी टी20 लीग स्पर्धेत खेळत होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रिंकु सिंह अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील इंडिया बी संघात खेळणार आहे. रिंकु सिंहची निवड दुलीप ट्रॉफी स्पर्धेत झाला नव्हती. तेव्हा रिंकु सिंह नाराज झाला होता. ‘माझं काम कठोर मेहनत करणं आहे आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत निवड झाल्याने खूश आहे. जेव्हा संघाची घोषणा झाली होती तेव्हा माझं नाव नव्हतं. तेव्हा मी दु:खी झालो होतो.आज मी खूप खूश आहे कारण दुलीप ट्रॉफी स्पर्धेत मला इंडिया बी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. मी रणजी ट्रॉफी स्पर्धेत इतके सामने खेळले नाही. मी दोन तीन सामने खेळलो होतो. माझी निवड झाली नव्हती. कारण मी चांगलं खेळलो नव्हतो.’

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वात बी संघाने शुबमन गिलच्या इंडिया ए संघाला पराभूत केलं होतं. या सामन्यात ऋषभ पंत आणि मुशीर खान यांनी चांगली खेळी केली होती.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.