Duleep Trophy : ऋतुराज गायकवाडच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, दोन चेंडू खेळल्यानंतर घडलं असं काही…
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात इंडिया बी आणि इंडिया सी यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कर्णधार इंडिया बी संघाने नाणेफेक जिंकली आणि ऋतुराज नेतृत्व करत असलेल्या बी संघाच्या वाटेला फलंदाजी आली. या सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवरच विचित्र प्रकार घडला आणि ऋतुराजला मैदान सोडावं लागलं.
देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरु असून इंडिया बी आणि इंडिया सी या संघात सामान होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर ऋतुराज कर्णधार असलेल्या इंडिया सी संघाच्या वाटेला फलंदाजी आली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन ही जोडी मैदानात आली. कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्ट्राईक घेत पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि आक्रमक पवित्रा दाखवून दिला. पण दुसऱ्या चेंडूवर त्याला तंबूत जाण्याची वेळ आली. इंडिया बी संघाकडून मुकेश कुमार षटक टाकत होता. पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर धाव घेताना ऋतुराज गायकवाडला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यामुळे रजत पाटीदारला फलंदाजीसाठी उतरावं लागलं.स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, पाय मुरगळ्याने त्याला वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. ऋतुराज गायकवाड मैदानातून बाहेर गेल्याने इंडिया सी संघाला मोठा धक्का बसू शकतो. पण त्याची दुखापत गंभीर नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरू शकतो.
ऋतुराज तंबूत परतल्यानंतर त्याला त्याच्या संघातील खेळाडूंनी नाराज केलं नाही. साई सुदर्शन आणि रजत पाटीदार यांनी चांगली भागीदारी केली. पहिल्या गड्यासाठी 92 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर रजत पाटीदार 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच साई सुदर्शन 43 धावांवर तंबूत परतला. अशी स्थिती ओढावली असताना इशान किशन आणि बाबा इंद्रजिथ यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी 150 च्या पार भागीदारी केली. तसेच संघाला 250 पार पोहोचवण्यास मदत केली.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. पहिल्या डावात त्याने 5 धावा करून बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत 46 धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण दुखापतीमुळे बाहेर जावं लागल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान, ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात इंडिया सी संघाने श्रेयस अय्यरच्या डी संघाला 4 विकेटने पराभूत केलं होतं.