एक दोन तीन चार..सात..! टी20 क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या खेळाडूने घेतल्या धडाधड विकेट Video

बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात दरबार राजशाही आणि ढाका कॅपिटल्स आमनेसामने आले होते. यात तस्किन अहमदने 4 षटकात 19 धावा देक 7 गडी बाद केले. यापूर्वी अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

एक दोन तीन चार..सात..! टी20 क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या खेळाडूने घेतल्या धडाधड विकेट Video
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 10:04 PM

बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेतील पाचव्या सामन्यात धडाधड विकेटची अनुभूती क्रीडारसिकांना घेता आली. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेचा सामना दरबार राजशाही आणि ढाका कॅपिटल्स यांच्यात रंगला होता. या सामन्यात ढाका कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय फसल्याचं दिसलं. तस्किन अहमदच्या गोलंदाजीमुळे धावांची गती मंदवली. सुरुवातीला लिटन दास आणि तन्झिद हसन यांच्या विकेट घेतल्या. त्यानंतर मधल्या फळीत स्टी एस्किनाझी आणि शहादत दिपू यांनी डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात तस्किन अहमदला यश आलं. त्यानंतर त्याने डेथ ओव्हरमध्ये कहर केला. उरलेल्या दोन षटकात चार विकेट घेत इतिहास रचला. तस्किन अहमदने 4 षटकात 19 धावा देत 7 गडी बाद केले. त्यामुळे ढाका कॅपिटल्सला फक्त 174 धावांपर्यंत मजल मारता आली. या धावांचा पाठलाग करताना दरबार राजशाही संघाने 3 विकेट गमवल्या आणि 18.1 षटकात आव्हान पूर्ण केलं.

बांग्लादेश प्रीमियर लीग इतिहासात पहिल्यांदाच 7 विकेट घेण्याची किमया साधली गेली आहे. यापूर्वी 17 धावा देत 6 गडी टीपून मोहम्मद अमिरने हा विक्रम नोंदवला होता. इतकंच काय तर लीग स्पर्धेत अशी कामगिरी करणार तस्किन हा पहिला गोलंदाज ठरला आहे. तर टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम मलेशियाच्या सियाझरुल इद्रासच्या नावावर आहे. त्याने 2023 मध्ये चीनविरुद्ध 8 धावांत 7 बळी घेतले होते. तर या यादीत कॉलिन अकरमनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. लीसेस्टरशायरकडून खेळताना ॲकरमनने 2019 मध्ये बर्मिंगहॅम बिअर्सविरुद्ध 18 धावांत 7 बळी घेतले होते.

View this post on Instagram

A post shared by FanCode (@fancode)

दोन्ही संघांचे खेळाडू

ढाका कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनजीद हसन, शहादत हुसेन दिपू, स्टीफन एस्किनाझी, थिसारा परेरा (कर्णधार), शुभम रांजणे, अलाउद्दीन बाबू, चतुरंगा डी सिल्वा, मुकिदुल इस्लाम, नजमुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान

दरबार राजाशाही (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद हरीस, जिशान आलम, अनामूल हक (कर्णधार), यासिर अली, रायन बर्ल, अकबर अली (विकेटकीपर), सब्बीर हुसैन, हसन मुराद, मोहोर शेख, शफीउल इस्लाम, तस्किन अहमद

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.