महेंद्रसिंह धोनी काम करत असलेल्या कंपनीवर ईडीची वक्रदृष्टी! नेमकं काय झालं? जाणून घ्या

देशभरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ठिकठिकाणी ईडीचे कारवाई सुरु आहे. मोठे मोठे आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे आतापर्यंत काहीच होणार नाही असं वाटणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. आता माजी क्रिकेटपटू एमएस धोनी 2012 पासून ज्या कंपनीसोबत काम करत आहे, त्या कंपनीवर ईडीची वक्रदृष्टी पडली आहे.

महेंद्रसिंह धोनी काम करत असलेल्या कंपनीवर ईडीची वक्रदृष्टी! नेमकं काय झालं? जाणून घ्या
महेंद्रसिंह धोनी नोकरी करत असलेली कंपनी ईडीच्या रडारवर! कसं आणि का? ते समजून घ्या
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 3:15 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज विकेटकीपर एमएस धोनी गेल्या काही वर्षांपासून एका कंपनीसोबत काम करत आहे. आता ही कंपनी ईडीच्या रडारवर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया सिमेंट्स कंपनीच्या चेन्नईतील हेडक्वॉर्टरवर ईडीची टीमने छापेमारी केली आहे. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालकी हक्क इंडिया सिमेंट्स लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीचे मालक एन श्रीनिवासन असून त्यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं अध्यक्षपद भूषवलं आहे. त्याचबरोबर तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनवरही त्यांचं एकछत्री अंमल राहिला आहे. पण आता ईडीच्या कारवाईमुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने फेमा ((FEMA- फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) अंतर्गत कारवाईचा बडगा उचलला असून विदेशी पैशांच्या देवाणघेवाणीवरून संशय असल्याचं सांगण्यात येत आहे. कंपनीने एमडी एन श्रीनिवासन यांच्या घरीही ईडीची एक टीम उपस्थित आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे.

इंडिया सिमेंट्सची मार्केट व्हॅल्यू जवळपास 7700 कोटी रुपये आहे. या कंपनीने 2008 मध्ये आयपीएलमध्ये चेन्नईची फ्रेंचायसी विकत घेतली होती. त्यावेळेस कंपनीने फ्रेंचायसीसाठी  9 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त पैसे मोजले होते. तसेच लिलावात एमएस धोनीसाठी सर्वाधिक किंमत मोजत संघात सहभागी केलं होतं. तेव्हापासून एमएस धोनी या संघासोबत असून कर्णधार आहे. पण खऱ्या अर्थाने एमएस धोनी इंडिया सिमेंट्स कंपनीसोबत 2012 पासून जोडला गेला आहे.

चेन्नईचं कर्णधारपद यशस्वीरित्या भूषवत असताना श्रीनिवासन यांच्याशी जवळचे संबंध प्रस्थापित झाले. 2012 मध्ये इंडिया सिमेंट्समध्ये धोनीला कर्मचारी म्हणून सहभागी करण्यात आलं. धोनीला तेव्हा कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) म्हणून नियुक्त केलं होतं. अपॉइंटमेंट लेटरनुसार, धोनीला तेव्हा 43 हजार रुपये बेसिक स्केलवर कंपनीत घेतलं होतं. तसेच वेगवेगळे भत्ते देत मासिक पगार हा 1.70 लाख रुपयांपेक्षा जास्त होता.

इंडिया सिमेंट्स कंपनीचे मालक आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवासन यांचं क्रिकेटशी फार जुनं नातं आहे. गेली अनेक वर्षे ते तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आहे. 2011 ते 2013 या कालावधीत त्यांच्याकडे बीसीसीआयचं अध्यक्षपद होतं. त्यानंतर आयसीसीच्या चेअरमनपदी बसले. त्यांनी हे पद 2014 ते 2015 या कालावधीत भूषवलं.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.