INDA vs BANA | यश धुल याचं झुंजार अर्धशतक, बांगलादेशला विजयासाठी 212 धावांचं आव्हान
India A vs Bangladesh A Semi Final 2 | टीम इंडिया ए ने बांगलादेश एसमोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान ठेवले आहे.
कोलंबो | कॅप्टन यश धूल याच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडिया ए ने एमर्जिंग एशिया कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये बांगलादेशसमोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाला दुर्देवाने संपूर्ण 50 ओव्हर खेळता आल्या नाहीत. मात्र यशने अखेरपर्यंत झुंज देत एकाकी खिंड लढवली. टीम इंडिया ए 49.1 ओव्हरमध्ये 211 धावांवर ऑलआऊट झाली. यश धूल याने 66 धावांची निर्णायक खेळी केली.
कोण मारणार फायनलमध्ये धडक?
Innings Break!
Captain Yash Dhull's impressive 66 helps India 'A' set a target of 2⃣1⃣2⃣ for Bangladesh 'A'!
Stay tuned for the chase.
Scorecard – https://t.co/XnH1m6JqPM#ACCMensEmergingTeamsAsiaCup | #ACC pic.twitter.com/JOpsgEK9ws
— BCCI (@BCCI) July 21, 2023
यश धूलने लाज राखली
बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची सावध सुरुवात झाली. टीम इंडियाला गेल्या सामन्यात विजय मिळवून देणारा शतकवीर साई सुदर्शन याच्या रुपात पहिला झटका लागला. त्यानंतर बांगलादेशने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. बांगलादेश गोलंदाजांनी एकही जोडीला मोठी भागीदारी करुन दिली नाही. साई सुदर्शन 21, अभिषेक शर्मा 34, निकीन जोस 17, निशांत सिंधू 5, रियान पराग 12, ध्रुव जुरेल 1 आणि हर्षित राणा 9 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे टीम इंडियाची 36. 5 ओव्हमध्ये टीम इंडियाची 7 आऊट 137 अशी नाजूक स्थिती झाली होती.
एका बाजूला विकेट जात होते. तर कॅप्टन यश धूल खिंड लढवत होता. यश आणि मानव सुथार या दोघांनी आठव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. या दरम्यान यशने लिस्ट ए करियरमधील दुसरं द्विशतक पूर्ण केलं. या जोडीकडून टीम इंडिया ए ला अपेक्षा होती. मात्र मानव सुथार चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. मानवने निर्णायक 21 धावा केल्या. त्यानंतर राजवर्धन हंगरगेकर याने टॉप गिअर टाकत 1 सिक्स आणि 1 फोर ठोकून 2 बॉलमध्ये 10 धावा केल्या. मात्र हंगरगेकर फटकेबाजीच्या नादात 15 रन्स करुन आऊट झाला.
आता शेवटची विकेट होती आणि मोजून 19 चेंडूंचा खेळ बाकी होता. पण टीम इंडियाला पूर्ण 50 ओव्हर खेळता आलं नाही. यश 50 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कॅच आऊट झाला आणि टीम इंडियाचा डाव आटोपला. यश धूलने 85 बॉलमध्ये 6 फोरसह 66 रन्स केल्या.
बांगलादेशकडून मेहदी हसन, तंजिम हसन आणि राकिबूल हसन या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रिपून मोंडोल, कॅप्टन सैफ हसन आणि सौम्य सरकार या तिघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
टीम इंडिया ए | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधु, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, युवराजसिंह डोडिया आणि राजवर्धन हंगरगेकर.
टीम बांगलादेश ए | सैफ हसन (कर्णधार), मोहम्मद नईम, तंजीद हसन, जाकिर हसन, महमूदुल हसन जॉय, सौम्य सरकार, अकबर अली (विकेटकीपर), महेदी हसन, रकीबुल हसन, तंजीम हसन साकिब आणि रिपन मोंडोल.