Emerging Asia Cup 2023: फक्त 59 धावा करूनही बांगलादेशने पाकिस्तानला नमवलं, अंतिम फेरीत भारताशी गाठ
Emerging Asia Cup: इमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत बांगलादेशने एन्ट्री मारली आहे. पाकिस्तानला अवघ्या 60 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानचा संघ 53 धावाच करू शकला.
मुंबई : इमर्जिंग वुमन्स आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक ठरला. टीम इंडियाने फक्त एक सामना खेळून अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, बांगलादेशने पाकिस्तानसमोर 60 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान हातात विकेट असूनही पाकिस्तानला गाठता आलं नाही. पाकिस्तान संघाला 53 धावाच करता आल्या आणि 6 धावांनी पराभव सहन करावा लागला आहे. ही स्पर्धा हाँगकाँगच्या माँगकॉकमध्ये सुरु आहे. पण पावसामुळे या स्पर्धेचं गणितच बदलून गेलं. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना होणार होता. पावसामुळे राखीव दिवशी सामना खेळण्याचं ठरलं पण तेव्हाही पाऊस झाल्याने भारताला रनरेटच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळालं.
दुसरीकडे, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. हा सामना पाकिस्ताने 6 धावांनी गमावला. पावसामुळे हा सामना 9 षटकांचा खेळला गेला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेशने 9 षटकात 7 गडी गमवून 59 धावा केल्या. पाकिस्तानचा संघ 4 गडी गमवून 53 धावा करू शकता. बांगलादेशकडून सर्वाधिक 21 धावा नाहिदाने केल्या. तर राबिया खान 10 धावांवर नाबाद राहिली.
Bangladesh A manage 59-7 in their innings in the rain-reduced semi-final ?
3️⃣ wickets for skipper @imfatimasana while Anoosha Nasir accounted for 2️⃣ batters ⚡#BackOurGirls | #WomensEmergingTeamsAsiaCup pic.twitter.com/FNaiOPCog9
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 20, 2023
बांगलादेशत 7 फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाही. पाकिस्तानची स्टार गोलंदाज फातिमा सनाने 10 धावा देऊन 3 गडी बाद केले. तर अनोशाने 6 रन्स देऊन 2 गडी टिपले. विजयासाठी दिलेल्या 60 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. मात्र वेगाने धावा करण्यात अपयशी ठरले.
एयमन फातिमाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने 18 धावा केल्या. तर कर्णधार फातिमा सनाने 8 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. बांगलादेशच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत पाकिस्तानला रोखलं. राबियाने 13 धावांवर दोन गडी बाद केले. तर नाहिदाने एक विकेट घेतली. त्यामुळे तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी अंतिम फेरीचा सामना होणार आहे.