Sahan Arachchigeची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर 134 धावांचं आव्हान, श्रीलंका रोखणार?

| Updated on: Oct 27, 2024 | 8:55 PM

Sri Lanka A vs Afghanistan A Final 1st Inning Highlights : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं आहे. सहान अरचिगे याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

Sahan Arachchigeची अर्धशतकी खेळी, अफगाणिस्तानसमोर 134 धावांचं आव्हान, श्रीलंका रोखणार?
sahan arachchige
Image Credit source: sri lanka cricket x account
Follow us on

एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 134 धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 133 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले होते. मात्र पवन रथनायके, सहान अरचिगे आणि निमेश विमुक्ती या त्रिकुटाने श्रीलंकेची लाज राखली. या तिघांनी केलेल्या खेळीमुळे श्रीलंकेला 130 पार मजल मारता आली आणि सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. आता अफगाणिस्तान हे आव्हान पूर्ण करत आशिया कपची ट्रॉफी उंचावते की श्रीलंकेचे गोलंदाज या धावांचा बचाव करतात? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

श्रीलंका ए प्लेइंग ईलेव्हन : नुवानिदू फर्नांडो (कॅप्टन), लाहिरू उदारा (विकेटकीपर), यशोधा लंका, अहान विक्रमसिंघे, सहान अरचिगे, पवन रथनायके, रमेश मेंडिस, दुशान हेमंथा, निमेश विमुक्ती, निपुण रंसिका आणि एशान मलिंगा.

अफगाणिस्तान ए प्लेइंग ईलेव्हन : दरविश रसूली (कर्णधार), झुबैद अकबरी, सेदीकुल्ला अटल, मोहम्मद इशाक (विकेटकीपर), शराफुद्दीन अश्रफ, शाहिदुल्ला कमाल, करीम जनात, अल्लाह गझनफर, कैस अहमद, अब्दुल रहमान आणि बिलाल सामी.