इंग्लंडने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडवर टी 20i मालिकेत 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20i-वनडे सीरिज होणार आहे. एकूण 3 सामन्यांची टी 20i मालिका होणार आहे. फिल सॉल्ट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20i सामना बुधवारी 11 सप्टेंबरला होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20i सामना द रोज बाऊल, साउथम्पटन येथे होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
बुधवारपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी 20i मालिका
Mark your calendars 📅#ENGvAUS promises to be a cracker 💥#SonySportsNetwork pic.twitter.com/M0FPdMngWE
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 10, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट (कॅप्टन) , विल जॅक्स, जॉर्डन कॉक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, सॅम करन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद आणि रीस टोपली.
टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, रिले मेरेडिथ, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, सीन एबॉट, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा.