ENG vs AUS: दुसऱ्या सामन्यासाठी Playing 11 मध्ये 4 बदल, ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

England vs Australia 2nd ODI Playing 11: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या सामन्यासाठी एकूण 4 बदल करण्यात आले आहेत.

ENG vs AUS: दुसऱ्या सामन्यासाठी Playing 11 मध्ये 4 बदल, ऑस्ट्रेलियाची बॅटिंग
travis head eng vs ausImage Credit source: England Cricket X Account
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 4:03 PM

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये टी 20i नंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची टी20i मालिका ही तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1-1 ने बरोबरीत सुटली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना हा 7 विकेट्सने जिंकला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. सामन्याचं आयोजन हे हेडिंग्ले, लीड्स येथे करण्यात आलं आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 4 बदल करण्यात आले आहेत.

साधारणपणे विजयी संघाची प्लेइंग ईलेव्हन न बदलण्याचा कर्णधाराचा कळ असतो. मात्र ऑस्ट्रेलियाने विजयी सलामीनंतर ही प्लेइंग ईलेव्हनमध्ये तब्बल 3 बदल केले आहेत. तर इंग्लंडने 1 बदल केला आहे. ऑस्ट्रेलिया टीममध्ये ऑलराउंडर ग्लेन मॅक्सेवल, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांचं कमबॅक झालं आहे. तर कॅमरुन ग्रीन, बेन द्वारशुईस आणि सीन एबोट या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, ऑली स्टोन, मॅथ्यू पॉट्स आणि आदिल रशीद.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.