Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs AUS : कॅरी-स्मिथची अर्धशतकी खेळी, इंग्लंडसमोर 305 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया विजयी हॅटट्रिक करणार?

England vs Australia 3rd Odi 1st Innings Highlights : एलेक्स कॅरी आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 300 पार मजल मारता आली. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे.

ENG vs AUS : कॅरी-स्मिथची अर्धशतकी खेळी, इंग्लंडसमोर 305 धावांचं आव्हान, ऑस्ट्रेलिया विजयी हॅटट्रिक करणार?
alex carey and steven smithImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 9:24 PM

एलेक्स कॅरी आणि अनुभवी स्टीव्हन स्मिथ या जोडीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांमध्ये 7 विकेट्स गमावून 304 धावा केल्या. कॅरी आणि स्मिथ या दोघांनी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर मार्नस लबुशेन याचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंड या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. ऑस्ट्रेलियाची अपेक्षित सुरुवात झाली नाही. कांगारुंनी 21 धावावंर पहिली विकेट गमावली. मॅथ्यू शॉर्ट 14 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 26 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाचा 47 स्कोअर असताना कॅप्टन मिचेल मार्श 24 धावांवर आऊट झाला.

तिसऱ्या विकेटसाठी स्टीव्हन स्मिथ आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनाी 94 रन्सची पार्टनरशीप केली. जेकब बेथेल याने ही जोडी फोडली. जेकबने कॅमरुन ग्रीन याला 42 धावांवर विल जॅक्सच्या हाती कॅच आऊट केलं. मार्नस लबुशेन आला तसाच गेला. ऑस्ट्रेलियाने इथून ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. स्टीव्हन स्मिथ याने 82 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने 30 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. आरोन हार्डी 44वर रनआऊट झाला. तर शॉन एबॉट आणि एलेक्स कॅरी ही जोडी नाबाद परतली. एलेक्सने केलेल्या नाबाद 77 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 300 पार मजल मारता आली. एलेक्सने 65 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर शॉन एबॉट 2 रन्सवर नॉट आऊट राहिला. इंग्लंडकडून जोफ्रा व्यतिरिक्त लियाम लिविंगस्टोन, विल जॅक्स, जेकब बेथेल आणि ब्रायडन कार्स या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कॅप्टन), स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स केरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, शॉन एबॉट, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि मॅथ्यू पॉट्स.

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.