ENG vs AUS 3rd Odi : इंग्लंडसाठी तिसरा सामना निर्णायक, ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी, कोण जिंकणार?

England vs Australia 3rd ODI Live Streaming: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम इंग्लंड विरूद्धच्या या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.

ENG vs AUS 3rd Odi : इंग्लंडसाठी तिसरा सामना निर्णायक, ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी, कोण जिंकणार?
england vs australia odiImage Credit source: England Cricket X Account
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 12:18 AM

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात टी 20i मालिकेनंतर  एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करतोय. तर हॅरी ब्रूक याच्या खांद्यावर इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलिया टीम या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं लक्ष हे विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याकडे लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंडसाठी हा प्रतिष्ठेचा असा सामना आहे. इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा तिसरा सामना कधी आणि कुठे पाहता येईल? हे आपण जाणून घेऊयात.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कधी?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना कुठे?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया तिसरा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड, शॉन ॲबॉट, बेन ड्वार्शुइस, जोश इंग्लिस , कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगुर्क आणि कूपर कॉनोली.

इंग्लंड टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, ऑली स्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, रीस टोपले, साकिब महमूद, जोफ्रा आर्चर , जॉर्डन कॉक्स आणि जॉन टर्नर.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.