इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या 2 कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. आतापर्यंत उभयसंघात 3 सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला 1 सामना जिंकता आला आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील चौथा सामना हा 27 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येणार आहे. हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर मिचेल मार्शकडे ऑस्ट्रेलियाची सूत्रं आहेत.
इंग्लंडसाठी हा करो या मरो असा सामना आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी पर्यायाने कांगारुंना मालिका जिंकण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत चौथ्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळवावा लागेल. तसेच हा सामना लॉर्ड्समध्ये असल्याने इंग्लंडसाठी हा सामना आणखी प्रतिष्ठेचा झाला आहे. त्यामुळे इंग्लंड या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडेही साऱ्या क्रिकेट विश्वाचं बारीक लक्ष असणार आहे.
दरम्यान इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात कॅप्टन हॅरी ब्रूक याच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 46 धावांनी मात केली होती. इंग्लंडने यासह ऑस्ट्रेलियाचा विजयीरथ रोखला होता. ऑस्ट्रेलियाचा हा सलग 14 एकदिवसीय विजयांनतर पहिला पराभव ठरला होता. त्यामुळे या विजयाने इंग्लंडचा विश्वास नक्कीच दुणावलेला असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उभयसंघात चौथ्या सामन्यात चांगलीच रस्सीखेंच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
इंग्लंड क्रिकेट टीम : हॅरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, रीस टोपले, साकिब महमूद, जॉर्डन कॉक्स, जॉन टर्नर आणि ऑली स्टोन.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, ॲडम झाम्पा, बेन ड्वार्शुस, जोश इंग्लिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि कूपर कॉनोली.