Eng vs Aus 3rd Test | पॅट कमिन्स याचा ‘सिक्स’, इंग्लंड 237 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाला इतक्या धावांची आघाडी
Ashes Series 2023 3rd Test Day 2 | ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्स याच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा 237 धावांवर डब्बा गूल झाला.
हेडिंग्ले | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हेंडिग्ले लीड्स इथे अॅशेस सीरिज मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी इंग्लंड 52.3 ओव्हरमध्ये 237 धावांवर ऑलआऊट झाली आहे. इंग्लंडला 237 धावांवर रोखल्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 263 धावा केल्या.
कॅप्टन बेन स्टोक्स याने सावरलं
Sensational batting from Ben Stokes helps England reduce the deficit to just 26!#WTC25 | #ENGvAUS ?: https://t.co/CIqx6cW10r pic.twitter.com/YZ42L1bhWo
— ICC (@ICC) July 7, 2023
इंग्लंडकडून कॅप्टन बेन स्टोक्स याने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. सलामीवीर झॅक क्रॉली याने 33 धावांचं योगदान दिलं. मार्क वूड 24 धावा करुन माघारी परतला. तर मोईन अली याने 21 रन्स केल्या. या चौघांव्यतिरिक्त उर्विरत 6 जणांपैकी एकालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. तर रॉबिन्सन हा 5 धावांवर नाबाद राहिला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु
इंग्लंडने 3 बाद 68 धावांपासून (19 ओव्हर) दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. जो रुट 19 आणि जॉनी बेयरस्टो 1 धावांवर नाबाद होते. मात्र दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच बॉलवर इंग्लंडला चौथा झटका लागला. जो रुट 19 धावांवर आऊट झाला आणि सुरुवात झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने झटके देत इंग्लंडला 52.3 ओव्हरमध्ये 237 धावांवर ऑलआऊट केलं.
बेन स्टोक्स याच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळू शकली नाही. स्टोक्सने 108 बॉलमध्ये 6 चौकार आणि 5 खणखणीत सिक्सच्या मदतीने 80 धावांची निर्णायक खेळी केली.
ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क याने 2 विकेट्स घेतल्या. मिचेल मार्श याने शतक ठोकल्यानंतर एक विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. तर टॉड मर्फी याने एकमेवर पण बेन स्टोक्स याची मोठी विकेट घेतली.
पॅट कमिन्स याचा सिक्स
That's the fourth six-wicket haul of Pat Cummins' Test career! #Ashes pic.twitter.com/Zt0fTIb7Zx
— cricket.com.au (@cricketcomau) July 7, 2023
इंग्लंड प्लेईंग इलेव्हन
बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वूड, ओली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉड.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन
पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, स्कॉट बॉलँड आणि टॉड मर्फी.