ENG vs AUS | ऑस्ट्रेलियाचा विजयी पंच, इंग्लंड टीमचं वर्ल्ड कपमधून पॅकअप

| Updated on: Nov 04, 2023 | 11:07 PM

England vs Australia | ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये 1993 नंतर पहिल्यांदा सलग 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर कांगारुंनी सलग 5 विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली.

ENG vs AUS | ऑस्ट्रेलियाचा विजयी पंच, इंग्लंड टीमचं वर्ल्ड कपमधून पॅकअप
Follow us on

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आपला सलग पाचवा विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 33 धावांनी विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडनेही चांगली झुंज दिली. मात्र इंग्लंडचे प्रयत्न 33 धावांनी कमी पडले. इंग्लंड 48.1 ओव्हरमध्ये 253 धावांवर ऑलआऊट झाली. कांगारुंनी या विजयाने सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. तर गतविजेत्या इंग्लंडचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय. इंग्लंड वर्ल्ड कपमधून बाहेर पडणारी दुसरी टीम ठरली आहे.

इंग्लंडची 287 धावांचा पाठलाग करताना वाईट सुरुवात झाली. जॉनी बेयरस्टो पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर डेव्हिड मलान याने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर तो 64 बॉलमध्ये 50 धावा करुन आऊट झाला. जो रुट 13 रन्सवर माघारी परतला. बेन स्टोक्स याने 90 बॉलमध्ये 64 धावांची खेळी केली. कॅप्टन जोस बटलर 1 धावेवर आऊट झाला. मोईन अली याने 42 धावा जोडल्या. लियाम लिविंगस्टोन 2 धावांवर बाद झाला.

त्यानंतर अखेरीस ख्रिस वोक्स, डेव्हिड व्हीली आणि आदिल रशीद याने तिघांनी जोर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना काही यळ आलं नाही. वोक्सने 33 बॉलमध्ये 32 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. डेव्हिड व्हीली 15 रन्सवर आऊट झाला. तर आदिलने 20 रन्स केल्या. मार्क वूड झिरोवर नाबाद परतला. ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्टार्क, जोस हेझलवूड आणि कॅप्टन पॅट कमिन्स या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मार्क्स स्टोयनिस याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

इंग्लंड दुसरी टीम

दरम्यान इंग्लंड वर्ल्ड कप 2023 मधून गाशा गुंडाळणारी दुसरी टीम ठरलीय. इंग्लंडआधी बांगलादेशने वर्ल्ड कपमधून पॅकअप केलं. आता इंग्लंड आणि बांगलादेश या दोन्ही संघांचे वर्ल्ड कपमधील प्रत्येकी 2-2 सामने बाकी आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचं पॅकअप

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद आणि मार्क वुड.