England vs Australia : तुम्हीच सांगा Out की Not Out | क्रिकेटच्य इतिहासात पहिल्यांदाच थर्ड अंपायरची गोची, पाहा Video
Steve Smith Run Out : अॅशेस मालिकेमधील अनेक निर्णय वादग्रस्त ठरलेले असताना आता यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. स्टीव्ह स्मिथ आऊट की नॉट आऊट यावरून क्रिकेच वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय वादग्रस्त ठरत असलेला पाहायला मिळत आहे. याआधीच मालिकेमधील अनेक निर्णय वादग्रस्त ठरलेले असताना आता यामध्ये आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. स्टीव्ह स्मिथ आऊट की नॉट आऊट यावरून क्रिकेच वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नेमकं काय झालंय?
पाचव्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 283 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंनी 295 धावा करत 12 दिवसांची आघाडी घेतली आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावांची महत्त्वाची खेळी केली. स्मिथ आणखी काही धावा काढू शकला असता मात्र पंचांचा तो एक निर्णय आणि त्याच्या खेळीचा शेवट झालेला पाहायला मिळाला.
78 व्या ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथने लेग साइटला बॉल मारत दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. दुसरी धाव पूर्ण करताना त्याने डाय मारली खरी पण पंचांनी त्याला बाद ठरवलं. जॉर्ज एल्हॅमचा थ्रो थेट बेअरस्टोच्या हातात आला आणि त्याने बाकी काम पूर्ण केलं. ज्यावेळी त्याने आऊट केलं होतं त्यावेळी स्मिथची बॅटही क्रिझमध्ये अललेली पाहायला मिळत आहे. तिसरे पंच नितीन मेनन यांनी स्मिथला आऊट देण्याचा निर्णय दिला.
पाहा व्हिडीओ-:
We have received a few questions regarding the decision in the below video.
Law 29.1 states: “The wicket is broken when at least one bail is completely removed from the top of the stumps, or one or more stumps is removed from the ground.” (1/2)#Ashes pic.twitter.com/RyZMgf5ItF
— Marylebone Cricket Club (@MCCOfficial) July 28, 2023
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (C), जॉनी बेअरस्टो (W), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (W), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (C), जोश हेझलवूड, टॉड मर्फी