England vs India 2nd T20I live Score, streaming : भारताने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी

| Updated on: Jul 09, 2022 | 10:46 PM

England vs India 2nd T20I live Score, streaming Updates in Marathi : इंग्लंड विरुद्ध भारताचा दुसरा T20 सामन्याकडे क्रिकेटप्रेमीचं विशेष लक्ष आहे. पहिल्या टी 20 सामन्यात 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडियासमोर आता एजबॅस्टनच आव्हान आहे. जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स

England vs India 2nd T20I live Score, streaming : भारताने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी
इंग्लंड विरुद्ध भारताचा दुसरा T20 सामनाImage Credit source: tv9

भारतीय क्रिकेट संघानं तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 170 धावांचे आव्हानात्मक धावसंख्या उभारली, त्याला प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा संघ 17 षटकात 121 धावा करत सर्वबाद झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय संघानं इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला.भारताकडून फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाने प्रथम 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर गोलंदाजीत टीम इंडियाची पहिल्याच षटकात विकेट घेत भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला हादरा दिला. या सामन्यात भुवनेश्वरने तीन तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी हर्षल पटेलला शेवटच्या सामन्यात एक विकेट मिळाली.दरम्यान, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Key Events

मालिकेत भारताकडे आता 1-0 अशी आघाडी

भारताने पहिल्या सामन्यात 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवला

आजच्या सामन्यात विराट कोहली आहे.

खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या विराट कोहलीवर दबाव

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 09 Jul 2022 10:33 PM (IST)

    भारताने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला

    भारताने इंग्लंडचा 49 धावांनी पराभव केला

    मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी

    भारतीय क्रिकेट संघानं तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 170 धावांचे आव्हानात्मक धावसंख्या उभारली, त्याला प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा संघ 17 षटकात 121 धावा करत सर्वबाद झाला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारतीय संघानं इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला.भारताकडून फलंदाजी करताना अष्टपैलू रवींद्र जडेजाने प्रथम 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यानंतर गोलंदाजीत टीम इंडियाची पहिल्याच षटकात विकेट घेत भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला हादरा दिला. या सामन्यात भुवनेश्वरने तीन तर जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी हर्षल पटेलला शेवटच्या सामन्यात एक विकेट मिळाली.दरम्यान, दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

  • 09 Jul 2022 10:08 PM (IST)

    क्रिस जॉर्डन आऊट

    क्रिस जॉर्डन आऊट

    इंग्लंडला पुन्हा एक धक्का

    रोहित आणि चहलने जॉर्डनला मैदानाबाहेर पाठवलं

  • 09 Jul 2022 09:53 PM (IST)

    सैम आऊट, इंग्लंडला आणखी एक धक्का

  • 09 Jul 2022 09:32 PM (IST)

    इंग्लंडला चौथा धक्का

    युझवेंद्र चहलने हॅरीला आऊट केलं

    इंग्लंडला चौथा धक्का

    लियाम लिव्हिन्स्टोनही पॅव्हेलियनमध्ये परतला

  • 09 Jul 2022 09:28 PM (IST)

    इंग्लंडला तिसरा धक्का

    जसप्रीत बुमराहनं इंग्लंडला दिला तिसरा धक्का

    लियाम लिव्हिन्स्टोन पॅव्हेलियनमध्ये परतला

  • 09 Jul 2022 09:25 PM (IST)

    काय तो अपमान!

    नवशिक्या गोलंदाजाच्या चेंडूवर आऊट होण्याची वेळ

    विराटची कामगिरी 5 महिन्यानंतरही ‘जैसे थे’

    चाहते भडकले, सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • 09 Jul 2022 09:15 PM (IST)

    भारताला दुसरं यश मिळवून दिलं

    क्या बात है भुवनेश्वर!

    कर्णधार जोस बटलरला बाद केलं

    भारताला दुसरं यश मिळवून दिलं

  • 09 Jul 2022 09:01 PM (IST)

    जेसन रॉय बाद

    भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला दिले दोन धक्के, जेसन रॉय बाद

  • 09 Jul 2022 08:48 PM (IST)

    भारताच्या आठ बाद 170 धावा

    भारताच्या आठ बाद 170 धावा

    इंग्लंडसमोर 171 धावांचं लक्ष्य

  • 09 Jul 2022 08:38 PM (IST)

    भुवनेश्वर कुमार आऊट

  • 09 Jul 2022 08:29 PM (IST)

    हर्षल पटेल आऊट

  • 09 Jul 2022 08:28 PM (IST)

    दिनेश कार्तिक आऊट

  • 09 Jul 2022 08:27 PM (IST)

    भारताच्या 115 धावा

    भारताच्या 15 ओव्हरमध्ये 5 बाद 115 धावा हार्दिक

  • 09 Jul 2022 07:59 PM (IST)

    हार्दिक पांड्या आऊट

    भारताला पुन्हा दोन धक्के

    सूर्यकुमारनंतर हार्दिक पांड्या आऊट

  • 09 Jul 2022 07:58 PM (IST)

    सूर्यकुमार यादव आऊट

    सूर्यकुमार 15 धावांवर बाद, कोहली पुन्हा अपयशी

  • 09 Jul 2022 07:53 PM (IST)

    भारताच्या 86 धावा

    भारताच्या 10 ओव्हरमध्ये तीन बाद 86 धावा

  • 09 Jul 2022 07:51 PM (IST)

    सुर्यकुमार यादवचा चौकार

    दहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉमध्ये यादवचा चौकार

  • 09 Jul 2022 07:49 PM (IST)

    हार्दिक पांड्याचा चौकार

  • 09 Jul 2022 07:37 PM (IST)

    विराट कोहलीचे आणखी एक अपयश!

    रिचर्ड ग्लीसनचा चेंडूत विराट कोहलीला मलानने झेलबाद केलं. विराट कोहलीचे आणखी एक अपयश!

    रिचर्ड ग्लीसन पदार्पणातच हॅट्ट्रिकवर

    रिचर्ड ग्लीसनचा चेंडूत पंतला बटलरने झेलबाद केले

  • 09 Jul 2022 07:33 PM (IST)

    Powerplay भारताचे 6 ओव्हरमध्ये 61 धावा 1 विकेट

    भारताचे 6 ओव्हरमध्ये 61 धावा 1 विकेट

  • 09 Jul 2022 07:28 PM (IST)

    रोहित शर्मा आऊट

    रिचर्डच्या चेंडूत जोस बटलरकडून रोहित शर्मा कॅच आऊट

  • 09 Jul 2022 07:18 PM (IST)

    ऋषभचा चौकार

    तिसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूत डेव्हिडच्या बॉलवर ऋषभचा चौकार

  • 09 Jul 2022 07:13 PM (IST)

    रोहितचा पुन्हा षटकार

    तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये रोहितचा षटकार

  • 09 Jul 2022 07:11 PM (IST)

    ऋषभ पंतचा चौकार

    दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलमध्ये ऋषभ पंतचा चौकार

  • 09 Jul 2022 07:09 PM (IST)

    रोहितचा षटकार

    पहिल्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूत रोहितचा षटकार

  • 09 Jul 2022 06:58 PM (IST)

    इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

    इंग्लंडने दोन बदल केले आहेत.

    विली आणि ग्लेसन यांनी टोपली आणि मिल्सची जागा घेतली.

    प्लेइंग इलेव्हन : जेसन रॉय, जोस बटलर (w/c), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, मोईन अली, सॅम कॅरेन, डेव्हिड विली, ख्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लेसन, मॅथ्यू पार्किन्सन.

  • 09 Jul 2022 06:53 PM (IST)

    टीम इंडियात चार बदल

    इशान किशनसोबतच दीपक हुडा, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलही बाद झाले आहेत.

    प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.

  • 09 Jul 2022 06:47 PM (IST)

    इंग्लंडच्या संघाचे प्लेइंग इलेव्हन

    इंग्लंड : जोस बटलर (सी), जेसन रॉय, डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, रीस टोपली, टायमल मिल्स, मॅट पार्किन्सन

  • 09 Jul 2022 06:46 PM (IST)

    टॉस करतानाचा खास फोटो पाहा

    खास फोटो पाहा

  • 09 Jul 2022 06:45 PM (IST)

    भारताचे प्लेइंग इलेव्हन

    भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

  • 09 Jul 2022 06:39 PM (IST)

    इंग्लंडने नाणेफेक जिंकली

    इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं की, मला प्रथम फलंदाजी करायची होती. गेल्या सामन्यातही भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत विजय मिळवला होता.

  • 09 Jul 2022 06:38 PM (IST)

    आज टॉस नंतर कुठला संघ जाहीर होणार?

    विराट कोहली कोणाच्या जागेवर खेळणार? हा सुद्धा प्रश्न आहे. विराटच्या समावेशामुळे दीपक हुड्डाला बाहेर बसवाव लागेल. आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 मध्ये त्याने शतक झळकावलं होतं. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात चांगल्या धावा केल्या होत्या. त्यामुळे आज टॉस नंतर कुठला संघ जाहीर होतो, त्याकडे लक्ष आहे.

  • 09 Jul 2022 06:34 PM (IST)

    इंग्लंडनं टॉस जिंकला

    इंग्लंड विरुद्ध भारताचा दुसरा T20 सामना

    इंग्लंडनं टॉस जिंकला

    भारताची पहिले फलंदाजी

    जाणून घ्या प्रत्येक अपडेट्स

  • 09 Jul 2022 06:34 PM (IST)

    इशान किशनने आतापर्यंत किती धावा केल्या?

    इशान किशनने आतापर्यंत 18 टी 20 सामन्यात 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 132 पेक्षा जास्त आहे. चार अर्धशतकं सुद्धा त्याने झळकावली आहेत. दुसरीकडे पंतचा टी 20 मध्ये रेकॉर्ड खूपच खराब आहे. पण तरीही ऋषभ पंतला संधी मिळू शकते. टीम मॅनेजमेंटने वेळोवेळी ऋषभ पंतवर विश्वास दाखवलाय.

  • 09 Jul 2022 06:28 PM (IST)

    एक महत्वाची माहिती

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराटनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही ब्रेक मागितला आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धचे आगामी दोन सामने या फॉरमॅटमधील त्यांचे भवितव्य लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विराटनं अनेकवेळा स्वत:ला सिद्ध केलं असलं तरी युवा खेळाडूंचा निडर खेळ पाहून त्याला पुन्हा आपल्या ओळखीच्या रंगात परतावं लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पॉवरप्लेमध्ये 66 धावा झाल्या आणि विकेट पडल्यानंतरही धावा होत राहिल्या. भारताला मात्र ‘फिनिशिंग’वर काम करावे लागणार आहे.

  • 09 Jul 2022 06:26 PM (IST)

    विराटनं गेल्या 15 सामन्यांमध्ये…

    विराटनं मागच्या पंधरा सामन्यांमध्ये 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

    विराटनं 55.77 च्या प्रभावी सरासरीनं आणि 134.58 च्या स्ट्राईक रेटनं एकूण 502 धावा केल्या आहेत.

    विराटनं सहा अर्धशतकेही ठोकली आहेत.

    विराटची सर्वोच्च धावसंख्या 85 धावा आहे.

  • 09 Jul 2022 06:23 PM (IST)

    संधी कोणाला मिळणार?

    विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचं संघात पुनरागमन झालं. त्यामुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यांच्या जागी संघात खेळणाऱ्या युवा खेळाडूंनी सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्यासमोर अनेक मोठे प्रश्न असतील. विराटच्या जागी दीपक हुडाने तिसऱ्या क्रमांकावर अप्रतिम खेळी केली आहे.

  • 09 Jul 2022 06:20 PM (IST)

    भारत विरुद्ध इंग्लंड आमनेसामने

    भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघात एकूण किती सामने खेळवले गेले. ते जाणून घ्या

    1. एकूण सामने – 20
    2. भारत जिंकला – 11
    3. इंग्लंड विजयी – 9
  • 09 Jul 2022 06:19 PM (IST)

    ऋषभ पंत ओपनिंगला येणार, इशान किशन पाणी देणार?

    पहिल्या टी 20 सामन्यात 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासमोर आता एजबॅस्टनच आव्हान आहे. हे तेच मैदान आहे, जिथे टीम इंडियाचा पाचव्या कसोटी सामन्यात पराभव झाला व कसोटी मालिका विजयाची संधी निसटली. आता याच मैदानात दोन्ही संघांमध्ये क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेट मधील सामना होणार आहे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या सामन्यामध्ये खेळणार आहेत. हे खेळाडू कोणाच्या जागेवर खेळणार? हा खरा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराह अर्शदीप सिंहच्या जागी खेळेल. कारण अर्शदीपची फक्त एका टी 20 सामन्यासाठी संघात निवड झाली होती. पण पंत आणि विराट कोणाची जागा घेणार? हा खरा प्रश्न आहे. माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल यांनी ऋषभ पंत बद्दल एक विधान केलय. ऋषभ पंतला सलामीला पाठवता येईल, असं पार्थिवने म्हटलं आहे.

    अधिक जाणून घेण्यासाठी, इथे क्लिक करा

  • 09 Jul 2022 06:17 PM (IST)

    भारत विरुद्ध इंग्लंड खेळपट्टी आणि हवामान

    या आठवड्यात एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विक्रमी 378 धावा सहज गाठल्या होत्या.

    ही खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांना अनुकूल दिसते.

    मात्र, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

    सरासरी तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि पावसाची शक्यता नाही.

  • 09 Jul 2022 06:14 PM (IST)

    2014 मध्ये काय झालं होतं?

    2014 मध्ये इंग्लंडनं भारताचा तीन धावांनी पराभव केला होता.

    त्यावेळी संघाला 2 चेंडूत 5 धावांची गरज होती. त्यानंतर कर्णधार धोनीने एकही धाव घेतली नाही.

    शेवटच्या चेंडूवर त्याला फक्त एक धाव घेता आली आणि भारताचा पराभव झाला.

  • 09 Jul 2022 06:11 PM (IST)

    अखेरच्या सामन्यात काय झालं?

    एजबॅस्टन मैदानावरच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता.

    इंग्लंडनं अखेरच्या डावात 378 धावा करून सामना जिंकला. या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20मध्येही टीम इंडियाचा पराभव झाला आहे.

  • 09 Jul 2022 06:00 PM (IST)

    इंग्लंडच्या संघाचे प्लेइंग इलेव्हन

    इंग्लंड : जोस बटलर (सी), जेसन रॉय, डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, रीस टोपली, टायमल मिल्स, मॅट पार्किन्सन

  • 09 Jul 2022 05:59 PM (IST)

    भारताचे प्लेइंग इलेव्हन

    भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

Published On - Jul 09,2022 5:57 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.