Team India : 46 दिवस, 5 सामने, टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा? पाहा वेळापत्रक
Team India Next Test Series : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 1-3 ने मालिका गमवावी लागली. त्यानंतर आता टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा होणार? जाणून घ्या.
ऑस्ट्रेलियाने सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियाला 6 विकेट्सने लोळवलं. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 162 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका 3-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने यासह 2014-15 नंतर तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली. जसप्रीत बुमराह याचा अपवाद वगळता या मालिकेत टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना काही खास करता आलं नाही. त्यामुळेच टीम इंडियावर ही मालिका गमावण्याची वेळ आली.
टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली. त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाला सातत्य ठेवता आलं नाही. टीम इंडियाचा या मालिका पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतूनही पत्ता कट झाला. आता त्यानंतर टीम इंडिया पुढील कसोटी मालिका केव्हा खेळणार? याबाबत आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीच्या मोहिमेतील सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाने 2024 मध्ये मायदेशात झालेल्या सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 4-1 ने धुव्वा उडवला होता. त्यामुळे इंग्लंड मायदेशात टीम इंडियावरुद्ध या पराभवाचा वचपा घेण्याच्या तयारीत असणार आहे.
इंडिया-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 20 ते 24 जून, हेडिंग्ले लीड्स
दुसरा सामना, 2 ते 6 जुलै, एडजबस्टन, बर्मिंगघम
तिसरा सामना, 10 ते 14 जुलै, लॉर्ड्स, लंडन
चौथा सामना, 23 ते 27 जुलै, एमीरेट्स ओल्ड ट्रॅफॉर्ड, मँचेस्टर
पाचवा सामना, 31 जुलै ते 4 ऑगस्ट, केनिंग्टन ओव्हल, लंडन
इंग्लंड संघाचा भारत दौरा 2025
दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मलिका खेळणार आहे. इंग्लंड या दोन्ही मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात टी 20i आणि एकदिवसीय मालिकेचा थरार अनुभवता येणार आहे.