England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!

इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.

England Tour India | ना जाडेजा, ना विहारी, तरीही इंग्लंडविरुद्ध भारताची मधळी फळी तुफानी!
इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 8:51 PM

चेन्नई : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर रोमांचक झालेल्या चौथ्या कसोटीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह कसोटी मालिकाही जिंकली. यासह टीम इंडियाने या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सांगता केली. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड टीम इंडियाविरोधात (England Tour India) कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी 18 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचे बहुतेक खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. तरीही इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 सामन्यांसाठी तगड्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. (eng vs ind test series team india strong middle order against england for two test)

टीम इंडियाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत दुखापतग्रस्त झाला. त्याला या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्याला दुखापतीमुळे 6-7 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. टीम इंडियाचे बरेच खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. यामुळे इंग्लंडचा सामना कसा करणार, या मोठा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांसमोर होता. यानंतरही टीम मॅनेजमेंटने मधल्या फळीत दमदार खेळाडूंना संधी दिली आहे. यामुळे भारतीय चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाकडून मधल्या फळीत रिद्धीमान साहा, रिषभ पंत, मयांक अग्रवाल यांना संधी देण्यात आली आहे. तर अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीतून पदार्पण केलं. चौथ्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याने पदार्पणातील या सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजी करताना पहिल्याच डावात अर्धशतकी खेळी केली. त्याने 62 धावा केल्या. तसेच शार्दुल ठाकूरसोबत पहिल्या डावात निर्णायक 123 धावांची भागीदारी केली. तर दुसऱ्या डावातही 22 धावा केल्या.

सुंदरने केलेल्या या ऑलराऊंड खेळीमुळे त्याला इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे.

शुबमन गिलला संधी

या पहिल्या 2 कसोटींसाठी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 91 धावांची खेळी केली. यामुळे गिलवर टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे गिल भारतात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव आणि अक्सर पटेल.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

संबंधित बातम्या :

England Tour India | ऑस्ट्रेलियाला धुतलं, आता इंग्लंडला लोळवण्यासाठी भारताचा तगडा संघ सज्ज

(eng vs ind test series team india strong middle order against england for two test)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.