ENG vs IRE : युवराजने सहा सिक्स मारलेल्या बॉलरने कसोटीमध्ये रचला इतिहास

आयर्लंडविरुद्ध पाच विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. ब्रॉडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

ENG vs IRE : युवराजने सहा सिक्स मारलेल्या बॉलरने कसोटीमध्ये रचला इतिहास
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 12:25 AM

मुंबई : आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्य कसोटी सामन्यामध्ये स्टुअर्ट ब्रॉडने झकास बॉलिंग केली आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडचा पहिला डाव 172 धावांवर संपला. यामध्ये एकट्या ब्रॉ़डने आयर्लंडचा अर्धा संघ माघारी पाठवला. या चमकदार कामगिरीने ब्रॉडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयर्लंडविरुद्ध पाच विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ब्रॉडने सलग दोन षटकांत तीन बळी घेत आयर्लंडला बॅकफूटवर पाठवले. आयरिश सलामीवीर जेम्स मॅकॉलम (36) आणि पॉल स्टर्लिंग (30) यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करून डाव काहीसा समर्थपणे सांभाळला होता. उपाहारानंतर ब्रॉडने मॅकॉलमच्या रूपाने आयर्लंडला पुन्हा मोठा धक्का दिला.

ब्रॉडने केलेला विक्रम

ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 20व्यांदा एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर पहिल्या 7 षटकात दोनदा 3 बळी घेणारा ब्रॉड पहिला गोलंदाज ठरला आहे. 25 वर्षांत फक्त ब्रॉडच हे करू शकला आहे.

ब्रॉडची लॉर्ड्सवर ५ बळी घेण्याची ही तिसरी वेळी होती. 2013 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याला शेवटच्या वेळी 5 विकेट्स मिळाल्या होत्या. 10 वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ब्रॉडने दुसऱ्या डावात 11 षटकात 44 धावा देत 7 बळी घेतले होते.

36 वर्षांच्या ब्रॉडने 2007 मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले. पदार्पणापासून आतापर्यंत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 581 विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 20 वेळा 5 विकेट घेण्यासोबतच त्याने मॅचमध्ये 3 वेळा 10 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.

दरम्यान, या विक्रमवीर ब्रॉडला भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. मात्र ब्रॉड खचून गेला नाही त्याने मेहनत घेतली आणि अजूनही तो इंग्लंडचा कसोटीमधील अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.