ENG vs NZ Head to Head Records | इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात कडवी झुंज, दोघांपैकी वरचढ कोण?
Engalnd vs New Zeland ICC World Cup 2023 Head to Head Records | इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघ वर्ल्ड कप 2023 मधील सलामीच्या सामन्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांची एकमेकांविरुद्ध कामगिरी कशी राहिली आहे हे जाणून घ्या.
अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना हा गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना गुरुवारी 5 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ या वर्ल्ड कपमधील सुरुवात विजयाने करण्याच्या हेतून मैदानात उतरतील. मात्र कुणा एका संघाचा विजय होईल. तर कुणा एका टीमचा पराभव होईल हे निश्चित. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघातील एकमेकांविरुद्धचे आकडे कसे आहेत हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड-इंग्लंड दोघांपैकी सरस कोण?
इंग्लंड-न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 95 सामन्यात दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहेत. इंग्लंडने 95 पैकी 45 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने इंग्लंडला 44 वेळा लोळवलं आहे. तर 4 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तसेच 2 सामने हे टाय झाले आहेत.
वर्ल्ड कपमधील आकडेवारी काय सांगते?
इंग्लंड-न्यूझीलंड दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये एकूण 10 वेळा आमनेसामने आले आहेत. इथेही दोन्ही संघ तोडीसतोड ठरले आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघ आतापर्यंत भारतात फक्त एकदाच एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. या एकमेव सामन्यात इंग्लंडचा विजय झाला आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी इंग्लंड क्रिकेट टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट टीम | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, मिचेल सँटनर आणि जेम्स नीशम.