ENG vs AUS WC 2023 : वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचं न्यूझीलंडला इतक्या धावांचं आव्हान

ICC World CUP ENG vs NZ : वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंड संघाला 283 धावांचं आव्हान दिलं आहे. दोन्ही संघांनी आपली सर्व ताकद लावत लावली. पहिला विजय मिळवण्यासाठी इंग्लंड संघाला किवींना 282 च्या आतमध्ये रोखावं लागणार आहे.

ENG vs AUS WC 2023 : वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचं न्यूझीलंडला इतक्या धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 6:18 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये (ICC World Cup ENG vs NZ)  सुरू आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 50 ओव्हरमध्ये 282 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून जो रूट याने सर्वाधिक 77 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. बटलर आणी रूटने संघाचा डाव सावरत एक भागीदारी करत संघाला मोठ्या आव्हानाकडे नेण्यास मदत केली. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंड संघाला 283 धावांचं लक्ष्य असणार आहे.

इंग्लंडची बॅटींग

टॉस जिंकत प्रथम  फिल्डिंग करण्याचा निर्णय न्यूझीलंड संघाने घेतला होता. बॅटींगला उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात काही खास झाली नाही. एक बाजूने जॉनी बेअरस्टोने आक्रमण सुरू केलं होतं. मात्र दुसरा सलामीवीर डेविड मलान  याला काही खास करता आलं नाही. मॅक हेन्री याने त्याला माघारी पाठवत पहिला धक्का दिला. जो रूट  मैदानावर आला आणि दोन्ही बाजूने न्यूझीलंडवर हल्ला केला मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात जॉनी बेअरस्टो (33 धावा)  मिचेल सँटनर याने माघारी धाडलं

जॉनी बेअरस्टोनंतर हॅरी ब्रूक (25 धावा), जोस बटलर (43 धावा),  लियाम लिव्हिंगस्टोन (20 धावा), मोईन अली (11 धावा), सॅम करन (14 धावा) करून स्वस्तात बाद झाले. जो रूट याने एकट्याने सर्वाधिक 77 धावा करत  इंग्लंडची एक बाजू लावून धरली होती.  इंग्लंडला हा सामना जिंकत विजयी सुरूवात करायची असेल तर न्यूझीलंड संघाला 282 धावांच्या आतमध्ये रोखावं लागणार आहे.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.