ENG vs NZ : जिगरा लागतो भाऊ, Joe Root याचा रिव्हर्स स्वीपने ट्रेंट बोल्टला 80 मीटरचा कडक सिक्स

joe Root Revers Six : इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील सामन्यामधील स्टार खेळाडू जो रूट याच्या सिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.

ENG vs NZ  : जिगरा लागतो भाऊ, Joe Root याचा रिव्हर्स स्वीपने ट्रेंट बोल्टला 80 मीटरचा कडक सिक्स
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 7:31 PM

मुंबई : भारतामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप 2023मधील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू आहे. इग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हर्समध्ये 282 धावा केल्या आहेत. इंग्लंड संघाकडून जो रूट याने सर्वाधिक 77 धावांची महत्त्वाची खेळी केली. रूट जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला, संघ संकटात सापडला असताना त्याने एक बाजू लावून ठेवलेली. रूटने मारलेला सिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-:

जो रूटने न्यूझीलंडचा स्ट्राईक बॉल असलेल्या ट्रेंट बोल्ट याला रिव्हर्स स्वीपने पाठीमागे कडक सिक्स मारला. सामन्याच्या 12 व्या ओव्हरमध्ये बोल्टच्या तिसऱ्या बॉलवर जो रूटने कला दाखवली. जो रूट आणि जोस बटलर असे शॉट्स मारताना दिसतात. आजच्या सामन्यात बटलर 43 धावांवर आऊट झाला. रूटने मारलेला सिक्स तब्बल 80 मीटर दूर गेला.

इंग्लंड संघाने 50 ओव्हरमध्ये 282 धावा केल्या, मात्र त्यांचे मुख्य फलंदाजा फेल गेले. हॅरी ब्रूक (25 धावा), जोस बटलर (43 धावा),  लियाम लिव्हिंगस्टोन (20 धावा), मोईन अली (11 धावा), सॅम करन (14 धावा) बटलर, बेअरस्टो आणि रूट वगळता इतरांना काही खास कामगिरी नाही कराता आली.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (w/c), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.