ENG vs NZ Live Streaming | इंग्लंड-न्यूझीलंड सामना, टीव्ही-मोबाईलवर फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
England vs New Zealand ICC world Cup 2023 Live Match Score | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या महाकुंभाला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड भिडणार आहेत. हा सामना कधी सुरु होणार, कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
अहमदाबाद | क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अवघ्या काही तासांवर आला आहे. आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून मोठ्या धडाक्यात सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना हा 2019 मधील फायनलिस्ट टीममध्ये होणार आहे. या सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. वर्ल्ड कप फायनल 2019 चा अंतिम सामना आणि सुपर ओव्हरही बरोबरीत सुटला होता. त्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक चौकाराच्या निकषावर विजेता ठरवण्यात आलं. त्यामुळे आता न्यूझीलंडचा पहिल्याच सामन्यात इंग्लंडला पराभूत करत वचपा काढण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना केव्हा खेळवण्यात येणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना हा गुरुवारी 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना कुठे खेळवण्यात येणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. क्रिकेट चाहत्यांना विविध भाषांमध्ये सामन्यांची कॉमेंट्री ऐकता येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळणार?
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या एपवर फुकटात पाहायला मिळणार आहे.
इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.
पहिल्या सामन्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट टीम | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, ईश सोधी, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, टिम साउथी, मिचेल सँटनर आणि जेम्स नीशम.