ENG vs NZ : मिशेल आणि ब्लंडेलनं इंग्लंडला बॅकफूटवर आणलं, न्यूझीलंड पहिल्याच दिवशी 300पार
बेन स्टोक्सनं न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांच्यातील 77 धावांची भागीदारी त्यानं मोडली.
नवी दिल्ली : इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ ) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं 4 बाद 318 धावा केल्या होत्या. डॅरेल मिशेल (Darrell Mitchell) आणि टॉम ब्लंडेल (Tom Blundell) नाबाद आहेत. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. मिचेल 147 चेंडूत 81 आणि 136 चेंडूत 67 धावा करून नाबाद आहे. 169 धावांत चार विकेट्स गमावल्यानंतर न्यूझीलंडचा संघ डळमळेल असं वाटत होते, पण ब्लंडेल आणि मिशेलने पुन्हा एकदा संघाची धुरा सांभाळली. या दोघांनी शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात कठीण काळात संघासाठी 195 धावांची भागीदारीही केली होती. इंग्लंडनं पहिल्या दिवशी चार झेल सोडले. याचा फटका त्याला सहन करावा लागला. न्यूझीलंडने पहिल्याच दिवशी 300 हून अधिक धावा केल्या.
न्यूझीलंडच्या डावाबद्दल सांगायचे तर बेन स्टोक्सन त्याला पहिला धक्का दिला. त्यानं विल यंगला बाद केलं. यंगचे अर्धशतक करता आलं नाही. त्यानं 47 धावा केल्या आणि जॅक क्रॉलीनं स्लिपमध्ये झेलबाद केलं. यंगने टॉम लॅथमसोबत पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. यंगनंतर जेम्स अँडरसनने पुढच्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला बाद केलं. लॅथमने 60 चेंडूत 26 धावा केल्या आणि मॅटी पॉट्सनं त्याचा झेल घेतला.
जेम्स अँडरसननं संघाला चौथे यश मिळवून
बेन स्टोक्सनं न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांच्यातील 77 धावांची भागीदारी त्यानं मोडली. निकोल्स 52 चेंडूत 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. त्याने स्टोक्सच्या चेंडूवर यष्टिरक्षक बेन फॉक्सकडून झेलबाद केलं. स्टोक्सनंतर जेम्स अँडरसननं संघाला चौथे यश मिळवून दिले. त्याने कॉनवेला फॉक्सकडून झेलबाद केले. कॉनवे 62 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. त्याने सात चौकार मारले.
एजाजच्या जागी मॅट
न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनला कोरोनाची लागण झाली आहे. तो या सामन्यात खेळत नाही. त्याच्या जागी टॉम लॅथमने संघाची कमान सांभाळली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या जागी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री, अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी मायकेल ब्रेसवेल आणि विल्यमसनच्या जागी हेन्री निकोल्सचा समावेश करण्यात आला आहे.