ENG vs NZ | Rachin Ravindra याचं वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक, इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी
Rachin Ravindra Fastest Century In Icc World Cup | रचिन रवींद्र या न्यूझीलंडच्या युवा फलंदाजाने इतिहास रचला आहे.रचिनने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात खणखणीत शतक ठोकलंय.
अहमदाबाद | न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या 23 वर्षीय युवा रचिन रविंद्र याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रचिनने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध 283 धावांचा पाठलगा करताना शतक ठोकत मोठा रेकॉर्ड केला आहे. रचिन वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रचिनने या शतकी खेळी दरम्यान तुफानी अंदाजात फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढलं. रचिनने या शतकी खेळीदरम्यान किती सिक्स आणि किती फोर ठोकले हे आपण जाणून घेऊयात.
रचिन रविंद्र यांच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. विशेष बाब म्हणजे रचिनचा इंग्लंड विरुद्धचा सामना हा त्याच्या वर्ल्ड कप कारकीर्दीतील पहिला सामना ठरला. या पहिल्याच सामन्यात रचिनने स्वप्नवत शतक ठोकलं. रचिनने 82 बॉलमध्ये वनडे कारकीर्दीतील आणि वर्ल्ड कपमधील पहिलंवहिलं शतक पूर्ण केलं. रचिन याच्याआधी डेव्हॉन कॉनव्हे याने वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिलंवहिलं शतक ठोकण्याचा बहुमान मिळवला. कॉनव्हे याने 83 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. रचिनने त्याआधी 36 बॉलमध्ये सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. तर रचिनने पुढील 50 धावा या 46 बॉलमध्ये पूर्ण केलं
न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक
दरम्यान रचिन न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रचिनने याबाबतीत डेव्हॉन कॉनव्हे, मार्टिन गुप्टील आणि स्टीफन फ्लेमिंग या तिघांना मागे टाकलं. डेव्हॉनने याच सामन्यात 83 बॉलमध्ये शतक केलं. मार्टिन गुप्टील याने 2015 मध्ये बांगलादेश विरुद्ध 88 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं. तर स्टीफन फ्लेमिंग याने 90 बॉलमध्ये बांगलादेश विरुद्ध 2007 साली सेंच्युरी केली होती.
रचिन रविंद्र याचं शतक
A scintillating maiden hundred from young sensation Rachin Ravindra drives the New Zealand chase 🎉@mastercard milestones moments 🏏#CWC23 | #ENGvNZ
Details 👉 https://t.co/W7jLpfcuNm pic.twitter.com/wNFD4AEYWn
— ICC (@ICC) October 5, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरान, ख्रिस वोक्स, आदिल रशीद आणि मार्क वुड.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री आणि ट्रेन्ट बोल्ट.