ENG vs PAK | पाकिस्तानसाठी इंग्लंड विरुद्ध करो या मरो परिस्थिती, सामना कुठे पाहता येणार?
England vs Pakistan Live Streaming | पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील आपला आठवा सामना हा बांगलादेश विरुद्ध खेळला होता. आता सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंड विरुद्ध चमत्कार करावा लागणार आहे.
कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील अखेरचा टप्पा सुरु आहे. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंआहे. तर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची 00.01 इतकी संधी आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत करत सेमी फायलमध्ये एक पाऊल टाकलं आहे. आता पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहाचायचं असेल तर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात चमत्कारिक विजय मिळवावा लागणार आहे.
पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी नेट रनरेटनुसार 275 धावांच्या फरकांनी विजयी व्हावं लागेल. तसेच 15 चेंडूमध्ये विजयी धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत, जे की अशक्य आहे. तर इंग्लंड टीम आधीच वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. मात्र त्यानतंरही इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफी 2025 क्वालिफिकेशन. वर्ल्ड कपमधील टॉप 8 संघ हे चॅम्पियन ट्ऱॉफीसाठी क्वालिफाय करणार आहेत. त्यामुळे इंग्लंडचा हा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी राहण्याचा प्रयत्न असणार आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे कधी पाहता येणार हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना केव्हा?
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना सामना शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे?
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार?
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी 2 वाजता सुरु होणार. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?
इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
इंग्लंड क्रिकेट टीम | जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि ब्रायडन कारसे.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ, उसामा मीर, शादाब खान, मोहम्मद नवाज आणि इमाम -उल-हक.