ENG vs PAK | इंग्लंडचा विजयी शेवट, पाकिस्तानचं पॅकअप

England vs Pakistan | गतविजेत्या इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्ध आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड केलाय. इंग्लंडने पाकिस्तानवर 93 धावांच्या फरकाने विजय मिळवलाय.

ENG vs PAK | इंग्लंडचा विजयी शेवट, पाकिस्तानचं पॅकअप
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 9:54 PM

कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज 11 नोव्हेंबर रोजी डबल हेडर अर्थात 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर मात करत सलग सातवा सामना जिंकला. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्या इंग्लंडने विजयी शेवट केला आहे. इंग्लंडने पाकिस्तानवर 93 धावांनी मात केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 338 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तान गुडघे टेकले. पाकिस्तान 43.3 ओव्हरमध्ये 244 धावांवर ऑलआऊट झाली. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना होता. दोन्ही संघांना वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पोहचण्यात अपयश आलं. त्यामुळे या दोन्ही टीमचं पॅकअप झालं आहे.

पाकिस्तानची बॅटिंग

इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतल्याने पाकिस्तानचं सेमी फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग झालं. इंग्लंडने पहिले बॅटिंग करताना 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 338 धावांचं आव्हान मिळालं. त्यामुळे नेट रनरेटनुसार पाकिस्तानची सेमी फायनलची संधी हुकली. मात्र पाकिस्तानसमोर आता विजय मिळवून शेवट गोड करण्याचं आव्हान होत. मात्र त्यातही पाकिस्तानला अपयश आलं.

पाकिस्तानची विजयी धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. पाकिस्तानचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना सुरुवात मिळाली. मात्र त्यांना विशेष काही करता आलं नाही. तर पाकिस्तानच्या शेपटीने चांगली फलंदाजी करत पराभवाचं अंतर हे 100 पेक्षा कमी करण्यात मोठी भूमिका बजावली.

पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक झिरोवर आऊट झाला. फखर झमान 1 रन करुन माघारी परतला. कॅप्टन बाबर आझम याने 38 धावांचं योगदान दिलं. मोहम्मद रिझवान 36 धावांवर माघारी परतला. सौद शकील याने 29 धावा जोडल्या. आघा सलमानने सर्वाधिक 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. इफ्तिखार अहमद याने 3 आणि शादाब खान 4 धावा करुन आऊट झाले. तर शाहीन अफ्रिदी, मोहम्मद वसीम ज्यूनिअर आणि हरीस रौफ या तिघांनी धमाका केला. या तिघांनी अखेरीस एकूण 76 धावा जोडल्या. शाहीनने 25, मोहम्मदने 16 आणि हरीसने 35 रन्स केल्या.

तर इंग्लंडकडून डेव्हिड व्हीली याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आदिल रशीद, गेस गेस ऍटकिन्सन आणि मोईन अली या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस वोक्स याच्या खात्यात 1 विकेट गेली.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.