ENG vs PAK Toss | इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन

England vs Pakistan Toss | पाकिस्तानची करो या मरोच्या सामन्यात पराभवानेच सुरुवात झालीय. पाकिस्ताने टॉस गमावलाय. तर इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय.

ENG vs PAK Toss | इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध टॉस जिंकला, पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 2:08 PM

कोलकाता | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 44 व्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन जॉस बटलर याने बॅटिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॉलिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोच्या पलीकडचा आहे. पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी ऐतिहासिक फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

इंग्लंडने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन जॉस बटलर याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर पाकिस्तानने प्लेईंग ईलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. हसन अली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळत नाहीये. तर हसनच्या जागी शादाब खान याला संधी देण्यात आली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप साखळी फेरीतील नववा आणि अखेरचा सामना आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

पाकिस्तान आणि इंग्लंड दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 10 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये पाकिस्तान इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. इंग्लंडने पाकिस्तानवर 4 सामन्यात मात केली आहे. तर पाकिस्तानने इंग्लंडवर 5 सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र आता पाकिस्तानला फक्त विजय मिळवून काहीच फायदा नाही, कारण त्यांना सेमी फायनलसाठी क्वालिफाय करायचं असेल, तर इंग्लंड जे विजयी धावांचं आव्हान देईल, ते अशक्य इतक्या ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागणार आहे.

पाकिस्तानसाठी विजयी समीकरण

इंग्लंडने विडयासाठी 50 धावांचं आव्हान दिल्यास पाकिस्तानला 2 ओव्हरमध्ये विजय मिळवावा लागेल. फोटोमध्ये पाहा विजयी आव्हान किती षटकांमध्ये पूर्ण करावं लागणार ते.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.

दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.