ENG vs PAK: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची हाराकिरी, इंग्लंडकडून व्हाईट वॉश

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघे काही तास शिल्लक असताना पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाचं मनोबळ खचलं आहे. या पराभवाचा प्रभाव टी20 वर्ल्डकपमध्ये पडू शकतो. त्यामुळे आतापासून पाकिस्तानी संघाच्या चाहत्यांना चिंता लागून आहे.

ENG vs PAK: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची हाराकिरी, इंग्लंडकडून व्हाईट वॉश
Follow us
| Updated on: May 31, 2024 | 6:31 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळावं यासाठी पाकिस्तानने काय काय केलं. खेळाडूंना आर्मी ट्रेनिंग दिली. कर्णधार बदलला आणि बाबर आझमकडे नेतृत्व दिलं. पण पाकिस्तान संघात काहीच फरक पडलेला नाही. वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने आयर्लंड आणि इंग्लंड दौरा कूरन तयारीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पाकिस्तानची कमकुवत बाजू उघड झाली. आयर्लंडने मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यात पाकिस्तान कशीबशी झुंज दिली आणि मालिका जिंकली. पण पाकिस्तानला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पराभवाची चव चाखावी लागली आहे. इंग्लंडने 4 सामन्यांच्या टी20 मालिकेत पाकिस्तानचा 2-0 ने पराभव केला. इंग्लंडने या मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला आहे. दोन सामने पावसामुळे झाले नाहीत आणि दोन सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानी संघाचं पितळ टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीच उघड पडलं आहे. लंडनमध्ये झालेल्या शेवटच्या टी20 सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं.

मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानने 19.5 षटकात सर्व गडी बाद 157 धावा केल्या आणि विजयासाठी 158 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडने हे आव्हान 15.3 षटकात पूर्ण केलं. इंग्लंडने 7 गडी आणि 27 चेंडू राखून पाकिस्तानला पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तानचा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही ठिकाणी कमकुवत असल्याचं अधोरेखित झालं आहे. त्यामुळे भारत 9 जूनला होणाऱ्या सामन्यात वरचढ ठरू शकतो. पाकिस्तानची कमकुवत बाजूचा अभ्यास करून साखळी फेरीत धोबीपछाड देता येईल. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये 6 जूनला अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, आझम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अमीर.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.