ENG vs SA | Heinrich Klaasen याचं वादळी शतक, इंग्लंडला 400 धावांचं आव्हान
England vs South Africa Icc World Cup 2023 | दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड विरुद्ध अखेरच्या काही षटकांमध्ये जोरदार आणि तोडफोड बॅटिंग केली. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर 400 धावांचं अवघड आव्हान ठेवलंय.
मुंबई | हेनरिक क्लासेन याच्या तोडफोड शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने इंग्लंडला विजयासाठी 400 धावांचं राउंड फिगर आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 399 धावा केल्या. हेनरिक क्लासेन याच्या व्यतिरिक्त इंग्लंडकडून तिघांनी अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला झोडपून काढला. या जोरावरच दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडसमोर 400 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं. दक्षिण आफ्रिकेच्या फटकेबाजीसमोर इंग्लंडचे बॉलर बेजार झाले.
दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर क्विंटन डी कॉक 4 रन्सवर आऊट झाला. रिझा हेंड्रिक्स याने 75 बॉलमध्ये 85 धावा केल्या. वॅन डेर डुसेन याने 60 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन एडन मारक्रम याने 42 धावा जोडल्या. डेविड मिलर याने 5 आणि गेराल्ड कोएत्झी याने 2 धावा केल्या. तर क्लासेन आणि मार्को जान्सेन या दोघांनी अखेरीस इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.या दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली. मिळेल तिथे फटके मारले.
हेनरिक क्लासेन याने 67 बॉलमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. तर मार्को जान्सेन याने 42 बॉलमध्ये 3 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 75 रन्सची खेळी केली. इंग्लंडकडून रीस टोपले याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर गस ऍटकिन्सन आणि आदिल रशिद या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या.
हेनरिक क्लासेन याने गेम बदलला
🇿🇦A spirited effort from the Proteas to get a total of 399/7. Heinrich Klaasen with a brilliant display 109 runs 🏏
🏴England will need 400 to win #CWC23 #BePartOfIt pic.twitter.com/2OsM7qz0gP
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 21, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.