ENG VS SL : 149 KM/H वेगाने बाउंसर आणि जागेवरच बसला श्रीलंकेचा खेळाडू, थेट हॉस्पिटलमध्ये रवानगी

इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. श्रीलंकन खेळाडूचं बाउंसर खेळताना गणित चुकलं आणि जोरदार फटका बसला. त्यामुळे मैदानातून थेट हॉस्पिटलला नेण्याची वेळ आली.

ENG VS SL : 149 KM/H वेगाने बाउंसर आणि जागेवरच बसला श्रीलंकेचा खेळाडू, थेट हॉस्पिटलमध्ये रवानगी
Image Credit source: (फोटो- MI News/NurPhoto via Getty Images)
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 11:05 PM

श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामन्यातील तिसरा दिवस सुरु आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावातील धावसंख्या पार करत 122 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना श्रीलंकेची चांगलीच दमछाक झाली. आघाडीच्या दोन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे मधल्या फळीवर दबाव वाढला. पण त्यातही दिनेश चंडिमलला दुखापत झाल्याने श्रीलंकेचं टेन्शन वाढलं आहे. तीन विकेट पडल्यानंतर दिनेश चंडिमल मैदानात उतरला होता. त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पहिल्या डावात चंडीमल काही खास करू शकला नव्हता. अवघ्या 17 धावा करून तंबूत परतला होता. पण श्रीलंकेच्या डावातील 18व्या षटकात नको ते घडलं. दुसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा विकेकटकीपर बॅट्समन दिनेश चंडिमल याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मैदान सोडावं लागलं.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्ग वू़डने इतक्या वेगाने चेंडू टाकला की त्याचा सामना दिनेश चंडिमलला जमलंच नाही. वूडने षटकातील दुसरा चेंडू बाउंसर टाकला. 147 च्या स्पीडने टाकलेला चेंडू चंडिमलला कळलाच नाही. चेंडूचा सामना करताना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. चेंडू जोराने अंगठ्यावर आदळला. उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी दुखायला लागली आणि सुजली. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं.

मिडिया रिपोर्टनुसार, दिनेश चंडिमलला रुग्णालयात नेलं आहे. दुखापत गंभीर असल्याने स्कॅनिंग केलं जात आहे. एक्सरेमध्ये कोणतंही फ्रॅक्चर नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे फलंदाजीला पुन्हा येऊ शकतो असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, दिनेश चंडिमल जेव्हा रिटायर्ड हर्ट झाला तेव्हा 10 धावांवर खेळत होता.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन) : दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, मिलन प्रियनाथ रथनायके

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड, शोएब बशीर.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.