World Record : रोहित ना कोहली, वर्ल्ड क्रिकेटमध्ये ‘हा’ खेळाडू महान फलंदाज- बड्या क्रिकेटपटूचे मोठे विधान

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या खेळाडूना राडा घातला आहे. भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही सर्वाधिक शतके करण्याच्या यादीमध्ये त्याने मागे टाकले आहे. अशातच माजी खेळाडूने हा खेळाडू महान खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.

World Record : रोहित ना कोहली, वर्ल्ड क्रिकेटमध्ये 'हा' खेळाडू महान फलंदाज- बड्या क्रिकेटपटूचे मोठे विधान
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 6:29 PM

जागतिक पातळीवर क्रिकेटमध्ये भारताचे दोन मुख्य खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा खेळाडू धुमाकूळ घालताना दिसत आहे. या खेळाडूने भारताच्या विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंना मागे टाकत इतिहास रचला आहे. या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केली असून अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. या खेळाडूचा झंझावत सुरू असताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉय याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

ज्या खेळाडूची चर्चा होत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून जो रूट आहे. श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्येही जो रूट याने शतकी खेळी केली. श्रीलंकेविरूद्ध शतक ठोकत रूट याने आपले कसोटी क्रिकेटमधील 34 वे शतक पूर्ण केले. कसोटीमध्ये सर्वाधिक शतके झळकवणारा रूट इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यासोबतच त्याने लिटल मास्टर सुनील गावसकर यांनाही मागे टाकलं आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये आताच्या घडीचा जो रूट हा महान फलंदाज आहे. जो रुट याने आपल्या तंत्राने आणि त्याच्यातील असलेल्या क्षमतेच्या जोरावर त्याने ही उंची गाठली. रूट एक उत्कृष्ट खेळाडूसह आदर्श व्यक्तीदेखील असल्याचं मायकेल वॉन याने म्हटलं आहे. रूटची ताकद म्हणजे कोणतीही जोखीम न घेता तो सहज स्ट्राईक रोटेट करतो, खूम कमी वेळात त्याच्या 25 धावा होतात, असंही वॉन म्हणाला.

जो रूट याने मोठा विक्रम रचला खरा पण त्यामध्ये एक कमी राहिली आहे. जो रूट याला ऑस्ट्रेलियामध्ये मोठी शतकी खेळी करता आलेली नाही. आगामी 2025 ला अॅशेसमध्ये कदाचित हा डागही तो पुसेल. 2012 मध्ये जो रूट याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जो रूटने आतापर्यंत 145 कसोटी सामन्यांच्या 265 डावांमध्ये 50.93 च्या उत्कृष्ट सरासरीने 12,377 धावा केल्या आहेत. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये 34 शतके आणि 64 अर्धशतके केली आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.