Joe Rootला एलिस्टर कुकचा महारेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

England vs Sri Lanka 2nd Test Cricket : जो रुट हा क्रिकेट विश्वातील सर्वात अनुभवी सक्रीय फलंदाजांपैकी एक आहे.रुटला श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

Joe Rootला एलिस्टर कुकचा महारेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज
joe root englandImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 9:55 PM

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 29 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. इंग्लंडने पहिला सामना हा 5 विकेट्सने जिंकला आहे. त्यामुळे इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. एका बाजूला श्रीलंकेसमोर जिंकण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडचा सामन्यासह मालिका विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात जो रुटला महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

जो रुट याच्या निशाण्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर एलिस्टर कूक याचा विक्रम आहे. एलिस्टर कूक याने इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंके विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर रुटला हा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी 186 धावांची गरज आहे. रुटने पहिल्या कसोटीत नाबाद अर्धशतकी खेळी करत श्रीलंके विरुद्ध विजयी केलं होतं. त्यामुळे रुटकडे 186 धावा करुन हा महारेकॉर्ड आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी आहे.

रुट दुसऱ्या कसोटीत  कूकचा रेकॉर्ड ब्रेक करणार का?

एलिस्टर कूक याने श्रीलंकेविरुद्ध 16 सामने खेळले आहेत. कूकने त्यापैकी 28 डावांध्ये 53.75 च्या सरासरीने 1 हजार 290 धावा केल्या आहेत. तर जो रुट दुसऱ्या स्थानी आहे. रुटने 11 सामन्यांमधील 20 डावात 1 हजार 105 धावा केल्या आहेत. त्यामुळे रुट दुसऱ्याच कसोटीत 186 धावा करत कूकचा रेकॉर्ड ब्रेक करणार की? त्याला तिसर्‍या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

इंग्लंड विरूद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी श्रीलंकेची प्लेइंग ईलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल,कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रत्नाययके.

विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.