ENG vs SL: Joe Root ला रोखणं अवघड! लॉर्ड्समध्ये सलग दुसरं शतक, रेकॉर्ड्सची रांग
Joe Root Century Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये इतिहास रचला आहे. रुटने दोन्ही डावात शतकी खेळी करत रेकॉर्ड्सची रांग लावली आहे.
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याला रोखणं अवघड होत चाललं आहे. जो रुटचा कसोटी क्रिकेटमध्ये धमाका सुरुच आहे. रुटने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे इतिहास रचला आहे. रुटने दुसऱ्या कसोटीत सलग दुसरं शतक ठोकलं आहे. रुटने पहिल्या डावातही सेंच्युरी केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या डावातही 121 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. जो रुटने डावातील 53 व्या ओव्हरमधील लहीरु कुमाराच्या दुसर्या बॉलवर चौकार मारुन शतक झळकावलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 34 वं शतक ठरलं. रुटने या शतकी खेळीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
जो रुट इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. रुटने माजी फलंदाज एलिस्टर कूक याच्या 33 कसोटी शतकांचा विक्रम मोडला. तसेच रुट लॉर्ड्समध्ये इंग्लंडकडून एकाच सामन्यात 2 शतकं करणारा एकूण चौथा फलंदाज ठरला. रुटआधी मायकल वॉन याने 2004 साली ही कामगिरी केली होती. त्याआधी ग्रॅहम गूच (1990) आणि जॉर्ज हेडली यांनी (1939) मध्ये हा कारनामा केला होता. इतकंच नाही, तर रुट इंग्लंडकडून लॉर्ड्समध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रुटने याबाबत ग्रॅहम गूच यांना मागे टाकलं.
श्रीलंकेला विजयासाठी 483 धावांचं आव्हान
दरम्यान जो रुटला शतकानंतर फार काही करता आलं नाही. रुट दुसऱ्या डावात 121 बॉलमध्ये 10 फोरसह 103 रन्सवर आऊट झाला. इंग्लंडने रुटच्या या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात ऑलआऊट 251 धावा केल्या. तसेच इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 427 धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेला 196 धावांवर रोखलं. त्यामुळे इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 483 धावांचं डोंगराएवढं आव्हान मिळालं आहे.
रुटचं शतकी जल्लोष
The perfect angle of Joe Root’s record-breaking century doesn’t exis- pic.twitter.com/zXeojPXpF0
— England Cricket (@englandcricket) August 31, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके.