ENG vs SL: श्रीलंका ऑलआऊट, कामिंदू मेंडीसची एकाकी झुंज, इंग्लंडकडे 231 धावांची आघाडी
England vs Sri Lanka 2nd Test : श्रीलंकेचा पहिला डाव हा 55.3 ओव्हरमध्ये 196 धावांवर आटोपला आहे. त्यामुळे इंग्लंडला 231 धावांची आघाडी मिळाली आहे.
श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवण्यात येत आहे. उभयसंघांची 2 दिवसांच्या आत 1-1 डावात बॅटिंग करुन झाली आहे. इंग्लंडने जो रुट आणि गस एटकीन्सन या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑलआऊट 427 धावा केल्या. मात्र श्रीलंकेला प्रत्त्युतरात 200 पारही जात आलं नाही. श्रीलंकेचा पहिला डाव हा 55.3 ओव्हरमध्ये 196 धावावंर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 231 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
श्रीलंकेकडून पहिल्या डावात एकट्या कामिंदू मेंडीस याने झुंज दिली. कामिंदुने 120 बॉलमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने सर्वाधिक 74 धावा केल्या. कामिंदुने केलेल्या या खेळीमुळे श्रीलंकेला 200 धावांच्या जवळ पोहचता आलं. मात्र कामिंदू व्यतिरिक्त एकालाही काही करता आलं नाही. दोघांना भोपळा फोडता आलं नाही. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि लहीरु कुमारा हे दोघेही झिरोवर आऊट झाले. प्रभाथ जयसूर्याने 8 धावा केल्या. निशान मधुशका आणि करुणारत्ने या दोघांनी प्रत्येकी 7-7 धावा केल्या. तर असिथा फर्नांडोने नाबाद 1* धाव केली.
श्रीलंकेसाठी पाथुम निसांका याने 12, अँजलो मॅथ्युज 22, दिनेश चांदिमलने 23, मिलन रथनायके 19 आणि तर पाथुम निसांका याने 12 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, गस एटकीन्सन, ओली स्टोन आणि मॅथ्यू पॉट्स या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शोएब बशीर याला 1 विकेट मिळाली.
इंग्लंडचं 196 धावांवर पॅकअप
England have bowled Sri Lanka out for 196 and will not enforce the follow-on 🙌
A brilliant team effort with the ball as all four seamers pick two wickets each 👏
Follow live here: https://t.co/d73vbDTigu#LoveLords | #EngvSL pic.twitter.com/O3OoxPjeIT
— Lord’s Cricket Ground (@HomeOfCricket) August 30, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकीन्सन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके