ENG vs SL: दुसरा दिवस इंग्लंडच्या नावे, श्रीलंकेविरुद्ध 256 धावांची आघाडी
Engalnd vs Sri Lanka 2nd Test Day 2 Stumps: इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यावर दुसऱ्या दिवशी मजबूत पकड मिळवली आहे. इंग्लंडने 256 धावांची आघाडी घेतली आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडच्या नावावर दुसरा दिवस राहिला. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 25 धावा केल्या. इंग्लंडला पहिल्या डावात 231 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर इंग्लंडने दुसर्या डावात 25 धावा जोडल्या. त्यामुळे आता इंग्लंडच्या खात्यात 256 धावांची आघाडी झाली आहे. डॅनियल लॉरेन्स याच्या रुपात इंग्लंडने एकमेव विकेट गमावली. लॉरेन्सने 7 धावा केल्या. तर बेन डकेट 15 आणि कॅप्टन ओली पोप 2 धावा करुन नाबाद परतले. श्रीलंकेकडून लहिरु कुमारा याने एकमेव विकेट घेतली.
त्याआधी श्रीलंकेला इंग्लंडच्या 427 धावांच्या प्रत्युत्तरात 55.3 ओव्हरमध्ये 196 धावाच करता आल्या. श्रीलंकेसाठी दुसऱ्या डावात कामिंदु मेंडीस याने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली. दोघे आले तसेच परत गेले. तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर इतरांना काही खास करता आलं नाही. निशान मधुशका आणि करुणारत्ने या सलामी जोडीने प्रत्येकी 7-7 धावा केल्या. पाथुम निसांका, अँजलो मॅथ्युज आणि दिनेश चांदिमल या तिघांनी अनुक्रमे 12, 22 आणि 23 अशा धावा केल्या. मिलन रथनायकेने 19 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन धनजंया डी सिल्वा आणि लहिरु कुमारा हे दोघे झिरोवर आऊट झाले. प्रभाथ जयसूर्या याने 8 धावा केल्या. तर असिथा फर्नांडो याने 1 धाव केली. इंग्लंडकडून मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन, गस एटकीन्सन आणि ख्रिस वोक्स या चौकडीने 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शोएब बशीरच्या खात्यात 1 विकेट गेली.
त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी हा 102 ओव्हरमध्ये 427 धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी जो रुट याने 143 तर गस एटकीन्सन याने 118 धावा केल्या. तसेच इतरांनी दिलेल्या योगदानासह इंग्लंडने 400 पार मजल मारली. मात्र रुट आणि एटकीन्सन या दोघांची मोठी भूमिका राहिली हे विसरुन चालणार नाही. श्रीलंकेकडून पहिल्या डावात असिथा फर्नांडो याने 5 विकेट्स घेतल्या. असिथा लॉर्डनसमध्ये 5 विकेट्स घेणारा श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज ठरला. तर मिलन रथनायके आणि लहिरु कुमारा या दोघांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर प्रभाथ जयसुर्या याने 1 विकेट मिळवली.
दुसरा दिवस इंग्लंडचा
Another delightful day at Lord’s 🥰 pic.twitter.com/Yt1t79Cxto
— England Cricket (@englandcricket) August 30, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकीन्सन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रथनायके