ENG vs SL : धनंजया-कामिंदुच्या शतकी भागीदारीने सावरलं, श्रीलंका दुसऱ्या दिवशी 114 धावांनी पिछाडीवर

England vs Sri Lanka 3rd Test Day 2 Highlights : England vs Sri Lanka 3rd Test Day 2 Highlights: श्रीलंकेच्या धनंजया डी सिल्वा आणि कामिंदू मेंडीस या दोघांनी सहाव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी केली.

ENG vs SL : धनंजया-कामिंदुच्या शतकी भागीदारीने सावरलं, श्रीलंका दुसऱ्या दिवशी 114 धावांनी पिछाडीवर
Dhananjaya de Silva and Kamindu Mendis
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 12:24 AM

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. खराब प्रकाशाने दुसऱ्या दिवशीही सामन्यात विघ्न घातलं. श्रीलंकेने इंग्लंडच्या 325 धावांच्या प्रत्युत्तरात खेळसंपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 45 ओव्हरमध्ये 211 रन्स केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात आक्रमक सुरुवात केली. पाथुम निसांका याने अर्धशतक ठोकलं. मात्र पाथुमने ज्या वेगात अर्धशतक केलं त्याच वेगाने श्रीलंकेने विकेट्स गमावल्या. श्रीलंकने फटकेबाजीच्या नादात 100 धावांच्या आतच 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे श्रीलंकेची बिकट स्थिती झाली होती. दिनेश चांदीमल याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेची स्थिती 5 बाद 93 अशी झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि कामिंदु मेंडीस या दोघांनी शतकी भागीदारी करत श्रीलंकेचा डाव सावरला.

धनंजया-कामिंदुने सावरलं

धनंजया आणि कामिंदुने श्रीलंकेला स्थिरता मिळवून दिली. श्रीलंकेने पाचवी विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने घट्ट पकड मिळवली. मात्र धनंजया आणि कामिंदु या दोघांनी सहाव्या विकेटसाठी खेळसंपेपर्यंत 118 धावांची नाबाद शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतक झळकावलं. धनंजयाने 106 बॉलमध्ये 10 फोरसह नॉट आऊट 64 रन्स केल्या. तर कामिंदुने 70 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 54 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे श्रीलंकेला तिसऱ्या दिवशी या जोडीकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे. त्याआधी श्रीलंकेसाठी पाथुम निसांका याने 51 बॉलमध्ये 64 रन्स केल्या. दिमुथ करुणारत्ने याने 9, कुसल मेंडीसने 14 आणि दिनेश चांदीमल याने 3 धावा केल्या. इंग्लंडकडून ओली स्टोन याने 2 विकेट्स घेतल्या. तर जोश हल आणि ख्रिस वोक्स या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

इंग्लंडचा पहिला डाव

दरम्यान इंग्लंडने 3 बाद 221 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र इंग्लंडने अवघ्या 64 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स गमावल्या. त्यामुळे श्रीलंका इंग्लंडला 325 धावांवर रोखण्यात यशस्वी ठरली. इंग्लंडकडून कॅप्टन ओली पोप याने सर्वाधिक 154 धावा केल्या. तर बेन डकेट याने 86 रन्स केल्या. श्रीलंकेकडून मिलन रथनायके याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विश्वा फर्नांडो आणि लहीरु कुमारा आणि धनंजया डी सिल्वा या तिघांना प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर असिथा फर्नांडोला 1 विकेट मिळाली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.

Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.