ENG vs SL : 64 धावात 7 विकेट्स, इंग्लंडची दुसऱ्या दिवशी घसरगुंडी, पहिल्या डावात 325 धावा

England vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंडचा पहिला डाव हा 325 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडने 64 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स गमावल्या.

ENG vs SL : 64 धावात 7 विकेट्स, इंग्लंडची दुसऱ्या दिवशी घसरगुंडी, पहिल्या डावात 325 धावा
sri lanka cricket teamImage Credit source: Icc X account
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 7:13 PM

इंग्लंड क्रिकेट टीम श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 325 धावांवर ऑलआऊट झाली आहे. इंग्लंडची दुसऱ्या दिवशी घसरगुंडी झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट आऊट करत गुंडाळलं. इंग्लंडला दुसऱ्या दिवशी 7 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 64 धावाच जोडता आल्या. तसेच इंग्लंडला दुसऱ्या दिवशी फक्त 104 धावाच करण्यात यश आलं. कॅप्टन ओली पोप याचं शतक आणि बेन डकेट याच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंड पहिल्या दिवसापर्यंत भक्कम स्थितीत होती. मात्र श्रीलंकेने दुसऱ्या दिवशी कमबॅक करत इंग्लंडला रोखण्यात यश मिळवलं.

इंग्लंडने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 44.1 ओव्हरमध्ये 221 धावा केल्या होत्या. ओली पोप याने 103 तर हॅरी बूक्र याने 8 धावांपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी आणखी 40 धावा जोडल्या. त्यानंतर हॅरी ब्रूक आऊट झाला. ब्रूक आणि आणि पोप या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. ब्रूक 19 धावा करुन आऊट झाला. त्यामुळे इंग्लंडचा स्कोअर 4 आऊट 261 असा झाला. इंग्लंडच्या डावाची इथून घसरण झाली.

श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ठराविक अंतराने झटके देत 325 धावांवर रोखलं. जेमी स्मिथ याने 16, ख्रिस वोक्स 2, गस एटकीन्सन 5, ओली पोप 154, जोश हल 2 आणि शोएब बशीर याने 1 धाव केली. श्रीलंकेकडून मिलन रथनायके याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन धनंजया डी सिल्वा, लहीरु कुमारा आणि विश्वा फर्नांडो या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर असिथा फर्नांडो याला 1 विकेट मिळाली.

श्रीलंकेने इंग्लंडला रोखलं

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.